AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय कपूरच्या मालमत्तेत ना करिश्मा कपूरची मुले, ना प्रिया सचदेवचा मुलगा… सावत्र मुलीचा असणार सर्वात जास्त हिस्सा

करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या मालमत्तेवरून बरीच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. त्याच्या मालमत्तेचे वाटप कसे असेल. किंवा कोणाला किती हिस्सा मिळणार याची चर्चा मात्र नक्कीच आहे. पण एका वृत्तानुसार संजयच्या मालमत्तेतील सर्वात मोठा हिस्सा हा त्याच्या सावत्र मुलीला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. कोण आहे त्याची ही सावत्र मुलगी?

संजय कपूरच्या मालमत्तेत ना करिश्मा कपूरची मुले, ना प्रिया सचदेवचा मुलगा... सावत्र मुलीचा असणार सर्वात जास्त हिस्सा
sanjay kapoorImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jul 02, 2025 | 7:32 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या व्यवसायाच्या आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या वारसाबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि, काही दिवसांनी संजय कपूरच्या कंपनीला नवीन अध्यक्षही मिळाला. पण तुम्हाला माहिती आहे का संजय कपूरच्या मालमत्तेत सर्वात मोठा हिस्सा कोणाला मिळणार आहे ते?

तीन मुलांपेक्षा सगळ्यात मोठा हिस्सा कोणाला मिळणार?

संजय कपूरने आयुष्यात तीन लग्ने केली. त्यांनी पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी केले. त्यानंतर त्यांनी करिश्मा कपूरशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी समायरा आणि मुलगा कियान आहे. अभिनेत्रीशी घटस्फोट घेतल्यानंतर संजयने तिसरे लग्न प्रिया सचदेवशी केले. या दोघांना एक मुलगा आहे. परंतु संजयच्या सावत्र मुलीला संजयच्या मालमत्तेत त्यांच्या तीन मुलांपेक्षा सगळ्यात मोठा हिस्सा मिळणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

संजयच्या मालमत्तेत सावत्र मुलीचा वाटा सर्वात जास्त आहे

संजय कपूरची एकूण संपत्ती 10,300 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. संजय 31 हजार कोटींच्या कंपनी सोना कॉमस्टारचे मालक होते. संजयच्या मृत्यूनंतर त्याची तिसरी पत्नी प्रिया हिला या कंपनीची नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आलं आहे. त्याच वेळी, संजयच्या संपत्तीत कोणाला किती हिस्सा मिळेल याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु वन इंडियाच्या एका अहवालात म्हटले आहे की संजय कपूरच्या संपत्तीत सफिरा चटवालला सर्वात जास्त वाटा मिळेल.

कोण आहे सफिरा चटवाल?

सफिरा ही संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव आणि तिचा एक्स पती विक्रम चटवाल ​​यांची मुलगी आहे. पालकांच्या घटस्फोटानंतर सफिरा तिच्या आईसोबत राहत होती. वृत्तानुसार, प्रियाशी लग्न केल्यानंतर संजय कपूरने सफिराची देखील जबाबदारी स्वतःवर घेतली होती. भारतीय कायद्यानुसार, संजयच्या संपूर्ण संपत्तीवर सफिराचा तितकाच अधिकार आहे जितका त्याच्या स्वतःच्या मुलांचा आहे. त्यामुळे एका वृत्तानुसार सफिराला मालमत्तेचा सर्वात जास्त हिस्सा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Follow Us
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी