अभिनेता संजय मिश्रा यांनी खरेदी केले करोडोंचे घर; इतर सेलिब्रिटीही याच भागात का होतायेत स्थायिक? काय आहे असं खास?
अभिनेता संजय मिश्रा यांनी या ठिकाणी खरेदी केले करोडोंचे घर खरेदी केले आहे. त्यांची ज्या ठिकाणी घर खरेदी केले आहे ते एक शांत ठिकाण आहे. पण फक्त संजयच नाही तर अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्याच भागात घर खरेदी केले आहे. पण सेलिब्रिटींना तेच ठिकाण घर घेण्यासाठी सर्वात जास्त का आवडत आहे? का आहे त्या जागेत असं खास जाणून घेऊयात.

बॉलीवूडमधील अनेक कलाकार आता प्रॉपर्टी घेण्याला जास्त प्राधान्य देत आहेत. अनेकजण घरांमध्ये पैसे गुंतवत आहेत. जसं की आता बॉलीवूड अभिनेता संजय मिश्रा यांनी देखील एक आलिशान घर विकत घेतलं आहे. त्यांनी 4.75 कोटी किमतीची एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे.संजय मिश्रा यांनी मड आयलंडमध्ये समुद्रकिनारी हे आलिशान घर खरेदी केलं आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले हे ठिकाण शांतता शोधणाऱ्यांसाठी उत्तम जागा आहे. हे क्षेत्र मलाड आणि अंधेरी सारख्या प्रमुख भागांशी जोडलेले आहे.
अनेक सेलिब्रिटींनी याच भागात घर खरेदी केले आहे
संजयच्या आधी अनेक सेलिब्रिटींनीही देखील याच भागात मालमत्ता खरेदी केली आहे. ज्यात सगळ्यात आधी नाव येतं ते अर्चना पूरण सिंगचं. त्यांचा तर तिचे लक्झरीअस बंगला आहे. तसेच गायक जुबिन नौटियाल यांचेही या परिसरात एक घर आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींचे पुढे या भागात घर घेण्याच्या नियोजनात आहेत. पण सेलिब्रिटींना हेच ठिकाण जास्त का आवडत आहे. चला जाणून घेऊयात.
बॉलीवूड सेलिब्रिटींना हे ठिकाण का आवडते?
मुंबईतील जुहू आणि वांद्रे सारख्या इतर पॉश एरिआच्या तुलनेत, मड आयलंड अधिक शांत आणि एकांत आहे. या ठिकाणी फेरीने जाता येते. ते शहराच्या गर्दीपासून खूप दूर आहे. कामावरून जेव्हा घरी येतो तेव्हा सर्वांनाच शांत वातावरण हवं असतं. असंच काहीस सेलिब्रिटींचही असतं. म्हणून ते कायम असंच शांत ठिकाणी घर घेण्याचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून तिथे ते गर्दी-गोंधळाशिवाय त्यांच्या कुटुंबासह तिथे आराम करू शकतील.
स्टुडिओ आणि ठिकाणांच्या जवळ
मड आयलंडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चित्रपट आणि टीव्ही स्टुडिओच्या जवळ असणे. गोरेगाव आणि मालाड सारख्या भागात अनेक मोठे स्टुडिओ आहेत, जिथे वारंवार शुटींग होत असते. मड आयलंडमध्ये राहणाऱ्या कलाकार आणि दिग्दर्शकांसाठी हा एक मोठा फायदा आहे, कारण ते ट्रॅफिकमध्ये न अडकता त्यांच्या शूटिंगच्या ठिकाणी सहजपणे पोहोचू शकतात.
शूटिंगसाठी सर्वोत्तम स्थान
मड आयलंड हे एक लोकप्रिय शुटींगचे ठिकाण आहे. जिथे जुने बंगले, समुद्रकिनारे आणि हिरवळ आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे शुटींग अनेकदा तिथेच होते. “सिंघम रिटर्न्स”, “कुली नंबर 1” आणि इतर अनेक टीव्ही मालिकांच्या चित्रपटांचे चित्रीकरण इथे झाले आहे. अनेक सेलिब्रिटी येथे बंगले यासाठी देखील खरेदी करतात कारण ते चित्रीकरणासाठी ते भाड्याने देऊन चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
परवडणाऱ्या किंमती
मुंबईतील मालमत्तेचा विचार केला तर, मड आयलंड जुहू किंवा बांद्रेपेक्षा अधिक परवडणाऱ्या मालमत्तेच्या किमती देते. येथे, सेलिब्रिटींना शहराच्या मध्यभागी नसलेल्या मोठ्या बंगल्यांसह त्याच किमतीत जास्त जागा मिळू शकते. यामुळे त्यांना त्यांचे स्वप्नातील घर खरेदी करता येते. आरामदायी आणि आलिशान जीवनशैली जगता येते. एकंदरीत, मड आयलंड हे बॉलिवूडसाठी एक असे ठिकाण आहे जे त्यांच्या कामाच्या, विश्रांतीच्या आणि वैयक्तिक जीवनाच्या गरजा एकाच वेळी पूर्ण करते.
