आईशिवायची पोर, बापही दूर, बॉयफ्रेंडही गमावला, दु:खाचा डोंगर कोसळला, मग संजय दत्तच्या मुलीनं काय केलं? एक प्रेरणादायी बातमी

आता सर्व काही संपले आहे, काहीही होऊ शकत नाही, आता कोणीही माझ्यासोबत नाही आणि माझ्यावर प्रेमही करत नाही.

आईशिवायची पोर, बापही दूर, बॉयफ्रेंडही गमावला, दु:खाचा डोंगर कोसळला, मग संजय दत्तच्या मुलीनं काय केलं? एक प्रेरणादायी बातमी

मुंबई : आता सर्व काही संपले आहे, काहीही होऊ शकत नाही, आता कोणीही माझ्यासोबत नाही आणि माझ्यावर प्रेमही करत नाही. आता मी काय करू असे म्हणत अनेक जन आयुष्यामध्ये हार मानतात आणि निराश होऊ काहीतरी मोठे पाऊले उचलतात किंवा मानसिक आजाराने ग्रस्त होतात. मात्र, अशावेळी देखील आपण काही गोष्टी विसरून आयुष्यात पुढे गेले पाहिजे असे बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त सांगते. आणि ती स्वत: या सर्व परिस्थितीमधून गेली आहे. तिने क्षणार्धात आपले सर्व काही गमावले होते. (See how Sanjay Dutt’s daughter Trishla will get herself out of that shock after her boyfriend Death)

मात्र, तिने हार न मानता मार्ग काढले त्रिशाला दत्तने 2019 मध्ये आपला प्रियकर गमावला, त्यानंतर ती स्वत: ला सांभाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होती. त्रिशालाने तिच्या इंस्टाग्रामवर ‘एस्क मी एनिथिंग’ या सत्रादरम्यान याची माहिती दिला आहे. त्रिशाला म्हणाली की, ‘मी वेदनेने जगायला शिकले आहे. मी दु: खापासून पळण्याऐवजी त्यांच्याशी मैत्री केली आहे. माझे ध्येय हे नेहमीच होते की दुःख दूर कसे करावे आणि मी ते केले देखील आता मी ठीक आहे. त्रिशाला ही अशी पहिली व्यक्ती नाही जिला या वेदना सहन कराव्या लागल्या,तिच्यासारख्या कितीतरी लोकांना अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो.

किंबहुना कितीतरी लोक या परिस्थितीमधून आजही जात असतील. या काळात आपल्याला आपल्या जोडीदाराच्या आठवणी परत परत येत असतील आणि त्याच्या आठवणीमध्ये आपण आयुष्यात पुढे देखील जाणू शकत नाहीत मात्र, आपण याचा जास्त विचार केला तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची निश्चित शक्यता असते. पण ज्याच्यासोबत आपण सर्व स्वप्न बघितलेली असतात असा व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानकपणे ज्यावेळी निघून जातोत त्याचे दुख होणे स्वाभाविकच आहे पण आयुष्यात पुढे जायचे असेल तर काही गोष्टी बाजूला करून पुढे जाणे देखील गरजेचे असते.

त्रिशालानेही तिचे आयुष्य रुळावर आणण्यासाठी सत्य स्वीकारले. तिला चांगले समजले होते की आता गेलेला वेळ आणि ती व्यक्ती परत कधीच येणार नाही. या काळादरम्यान तिने अनेक थेरपी घेतल्या ज्यामुळे तिला यासर्वांमधून बाहेर पडण्यास मदत झाली आणि तिने जास्तीत-जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत घातला.

संबंधित बातम्या : 

प्रभासच्या मागे संकटाचं शुक्लकाष्ट, ‘आदिपुरुष’नंतर ‘सालार’ची टीम दुर्घटनाग्रस्त!

Big News | चाहत्यांची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित?

अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

(See how Sanjay Dutt’s daughter Trishla will get herself out of that shock after her boyfriend Death)

Published On - 4:28 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI