Seema Haider | ‘बिग बॉस 17’मध्ये या खास व्यक्तीसोबत सहभागी होणार सीमा हैदर? स्पर्धकांची यादी लीक
बिग बॉस ओटीटी 2 चा फिनाले काही दिवसांपूर्वीच पार पडला आहे. विशेष म्हणजे या सीजनमध्ये प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन झाले. बिग बॉस ओटीटी 2 च्या धमाक्यानंतर आता प्रेक्षक बिग बॉस 17 ची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. सलमान खान हाच बिग बॉस 17 ला होस्ट करताना दिसेल.

मुंबई : नुकताच बिग बॉस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) चा फिनाले पार पडला. विशेष म्हणजे सलमान खान हाच बिग बॉस ओटीटी 2 होस्ट करताना दिसला. यंदाचे बिग बॉस ओटीटी 2 चे प्रचंड गाजले. एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता ठरला. बिग बॉस ओटीटी 1 करण जोहर हा होस्ट करताना दिसला. मात्र, निर्मात्यांनी अत्यंत मोठा निर्णय घेत बिग बॉस ओटीटी 2 मध्ये सलमान खान (Salman Khan) याला होस्ट म्हणून आणले. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये महेश भट्ट यांची लेक अर्थात पूजा भट्ट ही सहभागी झाली होती.
लेकीला भेटण्यासाठी महेश भट्ट देखील बिग बाॅसच्या घरात आले. आता बिग बॉस ओटीटी 2 संपले असून चाहते हे बिग बॉस 17 ची आतुरतेने वाट बघत आहेत. बिग बॉस 16 ने टीआरपीमध्ये मोठा धमाका केला. यामुळे आता बिग बाॅसच्या निर्मात्यांच्या बिग बॉस 17 कडून प्रचंड अपेक्षा आहेत. बिग बॉस 16 मध्ये एक खरी मैत्री बघायला मिळाले. अशी मैत्री बिग बाॅसच्या संपूर्ण इतिहासामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांनी बघितली.
बिग बॉस 16 मध्ये शिव ठाकरे, साजिद खान, सुंबुल ताैकीर, एमसी स्टॅन, अब्दू रोजिक आणि निम्रत काैर यांच्यामध्ये एक खास मैत्री होती. विशेष म्हणजे बिग बॉस 16 च्या शेवटच्या दिवसांपर्यंत ही मैत्री कायम होती. आता चाहत्यांमध्ये बिग बॉस 17 बद्दल मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे. बिग बॉस 17 चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.
इतकेच नाही तर बिग बॉस 17 च्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या नजरा आहेत. आता बिग बॉस 17 बद्दलची एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. नुकताच बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची लिस्ट लीक झालीये. विशेष म्हणजे या लिस्टमध्ये आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारत गाठलेल्या महिलेचे देखील नाव आहे.
अर्थात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपल्या प्रेमासाठी चक्क पाकिस्तानमधून सीमा हैदर ही भारतामध्ये दाखल झालीये. आता बिग बॉस 17 मध्ये सीमा हैदर ही सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे फक्त सीमा हैदर हिच नव्हे तर तिच्यासोबत तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा असलेला व्यक्ती देखील सहभागी होणार आहे.
तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, बिग बॉस 17 मध्ये सीमा हैदर हिच्यासोबत नेमके कोण सहभागी होणार? हा दुसरा तिसरा व्यक्ती कोणीरी नसून सचिन मीना हा आहे. होय तुम्ही खरे ऐकले आहे. सीमा हैदर हिच्यासोबत सचिन मीना हा बिग बॉस 17 मध्ये दाखल होणार आहे. सचिन आणि सीमा बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार असल्याचे ऐकल्यापासून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. मात्र, यावर अजून सीमा हैदर हिने काही भाष्य केले नाहीये.
