‘ही’ आहे बॉलिवूडची सर्वात श्रीमंत जोडी, 7000 कोटींहून अधिक संपत्ती, दोघांनी मिळून या..

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. शाहरुख खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. शाहरुख खान हा सोशल मीडियावरही सक्रिय दिसतो.

ही आहे बॉलिवूडची सर्वात श्रीमंत जोडी, 7000 कोटींहून अधिक संपत्ती, दोघांनी मिळून या..
| Updated on: Mar 16, 2024 | 5:02 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्षे अत्यंत खास ठरले. 2023 मध्ये शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट भेटीला आले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या चित्रपटांनी धमाका केला. 2019 नंतर शाहरुख खानचा 2023 मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शेवटी दणदणीत पुनरागमन शाहरुख खान याने केले. शाहरुख खान हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. फक्त अभिनयच नाही तर अनेक व्यवसायात शाहरुख खानने पैसा लावला आहे.

शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान ही जरी अभिनेत्री नसली तरीही ती अनेक बिझनेस चालवते. शाहरुख खान हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना शाहरुख खान दिसतो. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नक्कीच बघायला मिळते.

शाहरुख खान आणि गाैरी खान हे बाॅलिवूडमधील अशी जोडी आहे, ज्यांचे नेटवर्थ सर्वात जास्त असून ते सर्व बाॅलिवूड कलाकारांना कमाईमध्ये आरामात मागे टाकतात. शाहरुख खान आणि गाैरी खान 7304 कोटी संपत्तीचे मालक आहेत. अभिनयासोबतच शाहरुख खानची प्रोडक्शन कंपनी देखील आहे. गाैरी खान ही इंटीरियर डिजाइनिंग देखील आहे.

कोलकाता नाइट राइडर्सही आयपीएलमध्ये टीम देखील शाहरुख खान यांच्या मालकीची आहे. शाहरुख खान हा जाहिरातीच्या माध्यमातूनही कोट्यवधीची कमाई करतो. रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाची कंपनी शाहरुख खान आणि गाैरी खान हे मिळून चालवतात. गाैरी खान आणि शाहरुख खान यांना आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान हे तीन मुले आहेत.

शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. मुलगा आर्यन देखील बाॅलिवूडमध्ये धमाका करण्यास तयार आहे. काही दिवसांपूर्वीच सुहाना खान हिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शाहरुख खान याच्या चित्रपटांची वाट त्याचे चाहते हे कायमच बघताना दिसतात.