AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan याला कोणी दिली जीवे मारण्याची धमकी ! ‘पठाण’ने दिलेलं सडेतोड उत्तर चर्चेत

शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत असताना किंग खान याला जीवे मारण्याची धमकी ! अभिनेत्याने दिलेले उत्तर चर्चेत

Shah Rukh Khan याला कोणी दिली जीवे मारण्याची धमकी ! 'पठाण'ने दिलेलं सडेतोड उत्तर चर्चेत
शाहरुख खान
| Updated on: Feb 14, 2023 | 4:47 PM
Share

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या चार वर्षांपासून मोठ्या पडद्यावर न दिसणाऱ्या शाहरुख याने ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आणि भारतातच नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचले. ‘पठाण’ सिनेमाने काही दिवसांतच चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशात शाहरुख खान याने व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत गप्पा मारल्या आहेत. आस्क एसआरके (#AskSRK) सेशनमध्ये अभिनेत्याला चाहत्यांनी अनेक प्रश्व विचारले आणि किंग खान याने देखील सर्वांच्या प्रश्नांची उत्तर दिलं.

ट्विटरवर एका चाहत्याने शाहरुख याला विचारलं की, ‘सर जर तुम्ही आता रिप्लाय दिला नाही, तर तुम्हाला ‘फॅन २’ सिनेमा तयार करवा लागेला.’ शिवाय चाहत्याने चाकू असलेला इमोजी देखील पोस्ट केला आहे… यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, ‘असंही मी ‘फॅन २’ सिनेमा करणार नाही… तुला जे करायचं ते कर…’ सध्या चाहत्यांसोबत अभिनेत्याच्या रंगलेल्या चर्चां सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

विनोदी अंदाजात चाहत्याने चाकूची इमोजी पोस्ट करत किंग खान याला धमकी दिली, त्यावर अभिनेत्याने देखील चाहत्याला सडेतोड उत्तर दिलं. सांगायचं झालं तर, महत्त्वाच्या दिवसाचं निमित्त साधत शाहरुख कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आस्क एसआरके (#AskSRK) सेशनमुळे शाहरुख खान कायम चर्चेत असतो.

शहरुख खान सध्या ‘पठाण’ सिनेमामुळे देखील तुफान चर्चेत आहे. पठाण सिनेमाने जगभरातून 946 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यात सिनेमा १ हजार कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण निर्मात्यांची अपेक्षा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात पूर्ण करू शकला नाही. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा रंगत आहे. (shah rukh khan social media)

शाहरुख खान याचा पठाण सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला होता. अनेकांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी घेतली. पण कोणत्याही सिनेमाचा पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कोणताही परिणाम झालेला नाही. सिनेमाने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडले. (pathaan box office collection)

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.