AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखला ‘या’ बाबतीत कधीच यश मिळणार नाही; KKR च्या विजयानंतर गौतम गंभीर असं का म्हणाला?

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या 17 व्या हंगामात ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाने विजय मिळवला. विजयावर आपलं नाव कोरून मार्गदर्शक गौतम गंभीरने केकेआरला ‘आयपीएल 2024’चं चॅम्पियन बनवलं आहे.

शाहरुखला 'या' बाबतीत कधीच यश मिळणार नाही; KKR च्या विजयानंतर गौतम गंभीर असं का म्हणाला?
शाहरुख खान, गौतम गंभीरImage Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2024 | 10:41 AM
Share

अभिनेता शाहरुख खानचा कोलकाता नाइट रायडर्स (KKR) या संघाचा यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) हंगामात विजय झाला. चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादविरोधात केकेआरने हा विजय नोंदवला. शाहरुख 2008 पासून केकेआरचा सहमालक आहे. अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता हेसुद्धा या संघाचे सहमालक आहेत. यंदाच्या सिझनमध्ये गौतम गंभीर हा केकेआरचा मार्गदर्शक होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतम शाहरुखविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. शाहरुख संघाचा मालक असला तरी तो मालकसारखा नाही तर खेळाडूसारखा वागतो. असं गंभीर म्हणाला.

शाहरुखचं टीमशी कसं आहे नातं?

‘स्पोर्ट्सकीडा क्रिकेट’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गौतमने सांगितलं, “अर्थात टीमव्यतिरिक्त त्याच्याशी वैयक्तिक नातंसुद्धा आहे. शाहरुख गेल्या बऱ्याच वर्षांपासून या टीमशी भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला आहे. या टीमने अनेक चढउतारांचा सामना केला आहे. त्यांनी बरेच चांगले आणि वाईट क्षण पाहिले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही पडता काळ पाहिलेला असता, तेव्हा चांगले दिवस आल्यानंतर त्याचा जल्लोष साजरा केलाच पाहिजे.”

“मालक आणि खेळाडूंमध्ये एक नातं असणं खूप गरजेचं असतं. तुम्ही त्यांच्यासोबत एक मालक म्हणून नाही तर टीम मेंबर म्हणून वागलात, तर हे नातं अधिक मजबूत होतं. त्यामुळे तुम्ही मालक म्हणूनच वागावं असं काही गरजेचं नाही. तुम्ही खेळाडू म्हणूनही वागू शकता. खेळाडू हे खूप असुरक्षित वातावरणात वावरतात. ते एका अशा प्रोफेशनमध्ये आहेत, जिथे त्यांच्याविषयी प्रत्येकदिवशी मत बनवलं जातं. यात कोणतंही रिटेक नसतं”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

आयपीएल जिंकल्यानंतर गौतम गंभीरने डान्स केला का?

आयपीएलचा हा सिझन जिंकल्यानंतर तू कोणत्या गाण्यावर नाचलास असा प्रश्न गौतमला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर गंभीर हसत म्हणाला, “शाहरुख भाई त्याच्या आयुष्यात खूप यशस्वी ठरला आहे. भविष्यातही तो यश संपादित करत राहील पण अशी एक गोष्ट आहे, ज्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. ते म्हणजे मला नाचवणं. मला नाचवण्यात त्याला अद्याप यश मिळालं नाही आणि भविष्यातही तो यशस्वी ठरणार नाही. कारण मी गाऊ आणि नाचू शकतच नाही.” शाहरुखच्या केकेआर टीमने आतापर्यंत आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा यश मिळवलं आहे.

Follow Us
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?