27 वर्षांनंतर राहूल अन् अंजली पुन्हा एकत्र; फिल्मफेअरच्या स्टेजवर शाहरुख आणि काजोलचा रोमँटीक अंदाज
नुकताच फिल्मफेअरचा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात शाहरुख आणि काजोलचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळाला. दोघांनी देखील त्यांच्या लोकप्रिय भूमिका पुन्हा जिवंत केल्या. त्यांचा हा रोमँटीक अंदाज पाहून चाहत्यांच्या सर्व जुन्या आठवणी ताज्या झालया.
फिल्मफेअर पुरस्कार 2025 चा 70 वा वार्षिक फिल्मफेअर अवॉर्ड्स शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला होती. त्यात अनेक सेलिब्रिटींच्या जोडीला पुरस्कार मिळाला.ज्यामध्ये अनेक बॉलीवूड तारे उपस्थित होते, मात्र या मंचावर चर्चा झाली ती काजोल आणि शाहरूखच्या रोमँटीक जोडीची. शोचे मुख्य आकर्षण म्हणजे काजोल आणि शाहरुख खान यांचा डान्स. तब्बल 27 वर्षांनंतर काजोल आणि शाहरूखने त्यांचे सर्व लोकप्रिय भूमिका जिवंत केल्या.
लोकप्रिय गाण्यांवर काजोल अन् शाहरूखचा रोमँटीक डान्स
जसं की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ), कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है या त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील लडकी बडी अंजानी, सूरज हुआ मधाम, आणि तुझे देखा तो ये जाना सनम या गाण्यांवर बहारदार नृत्य केले. या व्हिडिओने चाहत्यांच्या त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. शाहरुख खान आणि काजोल यांनी कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है, आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील नृत्य सादर केले. किंग खान आणि काजोलने 27 वर्षांनंतर ‘लडकी बडी अंजानी’मधून हुक स्टेप पुन्हा तयार केली.
View this post on Instagram
काजोल आणि शाहरूख या रोमँटीक जोडीबद्दलच्या सर्व आठवणी ताज्या
व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि काजोल काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. किंग खानने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे, तर काजोलने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. हे दोघांचा पुन्हा एकदा हा रोमँटीक अंदाज पाहून सर्वांना पुन्हा एकदा या जोडीबद्दलच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. सर्वांनी काजोल आणि शाहरूखचा या अंदाजाचा, डान्सचा खूप आनंद घेतला.
17 वर्षांनंतर शाहरुख खानने केले फिल्मफेअरचे सूत्रसंचालन
जवळपास 17 वर्षांनंतर शाहरुख खानने फिल्मफेअरचे सूत्रसंचालन केलं. यावेळी त्याच्यासोबत करण जोहर, अक्षय कुमार आणि मनीष पॉल यांनी देखील सूत्रसंचालन केलं आहे. त्याच कार्यक्रमात भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल शाहरुख खानलाही पुरस्कार प्रदान केला गेला. जॅकी श्रॉफ, रवी किशन, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, हर्षवर्धन राणे, मोहनीश बहल आणि अनुपम खेर सारखे सेलिब्रिटी देखील या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.
