AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानची संपत्ती किती? इंटरनेटवर सर्च केल्या जातायत त्याच्याविषयी ‘या’ खास गोष्टी

'किंग खान' तब्बल इतक्या संपत्तीचा मालक; इंटरनेटवर 'या' गोष्टींबद्दल चाहते करतायत सर्च

शाहरुख खानची संपत्ती किती? इंटरनेटवर सर्च केल्या जातायत त्याच्याविषयी 'या' खास गोष्टी
'पठाण' सिनेमानंतर शाहरुख खान चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट; ज्यासाठी अभिनेता करतोय प्रचंड मेहनत
| Updated on: Nov 02, 2022 | 2:16 PM
Share

मुंबई- बॉलिवूडचा ‘बादशाह’ अर्थात अभिनेता शाहरुख खान आज (बुधवार) त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे इंटरनेटवर किंग खानशी निगडीत बऱ्याच गोष्टींविषयी सर्च केलं जातंय. त्याची संपत्ती किती आहे, त्याच्या कुटुंबाविषयीची माहिती.. अशा अनेक गोष्टींविषयी चाहते सर्च करत आहेत. शाहरुखविषयी सर्च केल्या जाणाऱ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, ते जाणून घेऊयात..

ट्विटरवर सकाळपासूनच SRK आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टी ट्रेंड होत आहेत. वाढदिवसानिमित्त शाहरुखने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. चाहत्यांना शाहरुखच्या संपत्तीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काही रिपोर्ट्सनुसार, शाहरुखची एकूण संपत्ती ही जवळपास 770 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. तर दरवर्षी तो जवळपास 38 दशलक्ष डॉलर्सची कमाई करतो.

शाहरुखच्या संपत्तीचं भारतीय रुपयांमध्ये रुपांतर केलं तर त्याची किंमत तब्बल 6142 कोटी रुपये इतकी होते. याशिवाय शाहरुखकडे जवळपास 12 आलिशान आणि महागड्या गाड्या आहेत. त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. अलिबागमध्येही त्याचा एक फार्महाऊस आहे. तर दुबईतही शाहरुखने घर विकत घेतलं आहे.

शाहरुखच्या संपत्तीसोबतच त्याच्या वाढदिवसाची तारीख आणि वेळ सर्च केलं जातंय. शाहरुखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्लीत झाला. त्याच्या वडिलांचं नाव मिर ताज मोहम्मद खान तर आईचं नाव लतीफ फातिमा आहे. 1981 मध्ये शाहरुखच्या वडिलांचं आणि 1991 मध्ये त्याच्या आईचं निधन झालं होतं.

शाहरुख खानची पत्नी गौरीबद्दलही इंटरनेटवर सर्च केलं जातंय. शाहरुखने 1991 मध्ये पहिलं प्रेम गौरीशी लग्न केलं. गौरी सध्या इंटेरिअर डिझायनिंगचं काम करते.

शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अबराम यांच्याविषयीही चाहत्यांकडून सर्च केलं जातंय. तर सुहाना खानच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....