Shah Rukh Khan | कायम नशेत असतो आणि… आर्यन खानचा ‘तो’ व्हिडीओ, संतापले चाहते
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, संतापलेले चाहते म्हणाले, 'कायम नशेत असतो...', आर्यनचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल.. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त आर्यन खानच्या व्हिडीओची चर्चा...

मुंबई | 17 मार्च 2024 : अभिनेता शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत असते. शाहरुख प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता असल्यामुळे किंग खानच्या कुटुंबाबद्दल देखील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. शाहरुखची लेक सुहाना खान, मुलगा आर्यन खान आणि अबराम खान देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता आर्यन खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. आर्यनचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका पार्टी दरम्यानचा आहे.
सध्या आर्यनचा व्हिडीओ व्हायरल होत तो हॉलिवूड सिंगर एड शीरन याच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टी दरम्यानचा आहे. पार्टीमध्ये रॉयल अंदाजात आर्यन खान याने एन्ट्री केली. लेदरच्या जॅकेटमध्ये आलेल्या आर्यन सर्वांचं लक्ष वेधलं. पण अनेकांनी आर्यनला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
आर्यनच्या व्हायरल व्हिडीओ कमेंट करत अनेकांना किंग खानच्या मुलावर निशाणा साधला आहे. आर्यनच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आर्यन कायम इतका गंभीर का असतो.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हा तर कायम नशेत असतो…’, तिसरा नेटकरी म्हणाली, ‘पार्टीत एन्ट्री अशी तर एक्झिट कशी असेल…’ सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा आर्यन खानला ट्रोल करण्यात आलं आहे. याआधी अनेकदा आर्यन खान याने ट्रोलिंगचा सामना केला आहे.
आर्यन खानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्यन याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं नसलं तरी शाहरुख खानचा मुलगा असल्यामुळे आर्यन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टार किडच्या यादीत देखील आर्यन अव्वल स्थानी आहे.
आर्यनच्या चाहत्यांची संख्या फार मोठी असल्यामुळे त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील आर्यनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आर्यन प्रमाणेच सुहाना आणि अबराम देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.
