Pathaan | ‘जे लोक सत्तेत आहेत त्यांचा मी..’, ‘पठाण’च्या रिलीजपूर्वी शाहरुखला करावं लागलं ‘हे’ मोठं काम

पठाण प्रदर्शित झाल्यानंतर पाच दिवसांनी चित्रपटाची टीम माध्यमांसमोर आली. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी चित्रपटाशी संबंधित बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली.

Pathaan | 'जे लोक सत्तेत आहेत त्यांचा मी..', 'पठाण'च्या रिलीजपूर्वी शाहरुखला करावं लागलं 'हे' मोठं काम
Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 1:32 PM

मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यातील एका दृश्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. याच भगव्या बिकिनीवरून हिंदूंच्या भावना दुखावल्याच आरोप झाला. हा वाद इतका वाढला की ‘पठाण’वर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली. या वादादरम्यानच 25 जानेवारी रोजी ‘पठाण’ प्रदर्शित झाला. यावेळी बऱ्याच थिएटर्सबाहेर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही ठेवाला लागला. कोणत्याही वादाशिवाय ‘पठाण’ प्रदर्शित व्हावा यासाठी शाहरुखने कोणते प्रयत्न केले, याविषयी त्याने माध्यमांसमोर खुलासा केला.

पठाण प्रदर्शित झाल्यानंतर पाच दिवसांनी चित्रपटाची टीम माध्यमांसमोर आली. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी चित्रपटाशी संबंधित बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान शाहरुखने सांगितलं की त्याचा चित्रपट शांतीपूर्ण पद्धतीने प्रदर्शित करण्यासाठी त्याने काही लोकांना कॉल केले होते.

शाहरुखने मानले आभार

“या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. म्हणूनच आम्ही या मुलाखतीत सर्वांचे खूप जास्त आभार मानणार आहोत. देवाचे, गॉडचे आणि अल्लाहचे खूप खूप आभार. जे लोक या चित्रपटाशी संबंधित आहेत त्यांचा आणि माध्यमांचाही मी आभारी आहे”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“मी त्या लोकांचे आभार मानू इच्छितो जे सत्तेत आहेत. कारण एकवेळ अशी आली होती की आम्हाला लोकांना फोन करावे लागले होत आणि सांगावं लागलं होतं की कृपया आमच्या चित्रपटाला प्रेमाने रिलीज होऊ द्या. त्या सर्वांनी हा कार्यभार स्वीकारला आणि कोणत्याही वादाशिवाय चित्रपट प्रदर्शित झाल्याचा मला खूप आनंद आहे”, असं शाहरुखने सांगितलं.

चित्रपट हे आनंदाचं माध्यम- शाहरुख खान

शाहरुखने याविषयी पुढे म्हटलं, “माझ्यासाठी ही सर्वांत महत्त्वपूर्ण बाब आहे की लोकांनी प्रेमाने माझा चित्रपट पहावा. चित्रपट पाहणं हे आनंदाचं माध्यम आहे. त्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.