AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान मध्यरात्री गौरीपासून लपून-छपून कोणाच्या घरी जायचा? होती फारच खास व्यक्ती, मित्राकडून खुलासा

शाहरुख खान अनेकदा मध्यरात्री घरात कोणालाही न सांगता एका वस्तीवर जायचा. तो ज्या व्यक्तीला भेटायला जायचा ती व्यक्ती त्याच्या फारच जवळची होती. एका मुलाखतीत कॉमेडियन सुनील पाल यांनी हा किस्सा सांगितला आहे. जो कदाचित आजपर्यंत कोणालाही माहित नाही.

शाहरुख खान मध्यरात्री गौरीपासून लपून-छपून कोणाच्या घरी जायचा? होती फारच खास व्यक्ती, मित्राकडून खुलासा
| Updated on: Dec 21, 2024 | 9:50 PM
Share

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान याच्याबद्दलचे सगळेच फॅन आहेत. त्याच्या अभिनयाचं, त्याच्या मेहनतीचं नेहमीच कौतुक होतं. तसेच त्याच्याबद्दलचे अनेक किस्सेही इंडस्ट्रीत सांगितले जातात. सुनील पाल यांनी एका मुलाखतीत शाहरूख खान संबंधित एक घटना सांगितली होती.

सुनील पाल यांनी सांगितला शाहरूखचा तो किस्सा

शाहरूख खान बरेच महिने मध्यरात्री गौरीपासून लपून-छपून कोणाच्या तरी घरी जायचा. आणि तो असं 4-5 महिन्यांतून असं करायचा. तर तो नेमका कुठे जायचा याच उत्तर कॉमेडियन सुनील पाल यांनी दिलं आहे.

सुनील पाल यांनी सांगितले होते की, शाहरुख खान मध्यरात्री झोपडपट्टी भागात जायचा आणि तो 4-5 महिन्यातून एकदा असं करायचा. शाहरुख मध्यरात्री घरातून निघून झोपडपट्टीत कोणाला तरी भेटायला जायचा. असं सांगत सुनील पाल यांनी त्या व्यक्तीच्या नावाचाही खुलासा केला आहे.

शाहरुख खान मध्यरात्री कोणाला भेटायला जायचा?

शाहरुख खानच्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा शेअर करताना सुनील पाल म्हणाले की, शाहरुख खान नक्कीच सिनेमाचा सुपरस्टार आहे, पण तो त्याच्या जवळच्या प्रत्येकाची खूप काळजी घेतो आणि तो डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. सुनील पाल यांनी सांगितले की, “एकेकाळी शाहरुख खान झोपडपट्टीत त्याच्या एका स्टाफ मेंबरला त्याच्या घरी भेटायला जायचा. शाहरुख शांतपणे त्याच्या घरी जायचा आणि 15-20 मिनिटे थांबून परत घरी जायला निघायचा”

शाहरुख खान त्याच्या ड्रायव्हरला भेटायला जायचा

सुनील पाल यांनी पुढे सांगितले की, “त्या व्यक्तीचे नाव सुभाष होते आणि आता तो या जगात नाही. एकेकाळी तो शाहरुख खानचा ड्रायव्हर असायचा. अशा परिस्थितीत तो दर 5-6 महिन्यांनी त्याच्या घरी जात असे, मात्र शाहरुखच्या घरातील कोणालाही याची माहिती नव्हती.”

सुनील पाल यांनी शाहरूखच्या सांगितलेल्या किस्सावरून खरोखच शाहरूख खान हा खऱ्या आयुष्यातही बादशाह आहे हे दिसून येते. तसेच शाहरूख खानला त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीची तेवढीच काळजी आहे हेही या प्रसंगावरून दिसून येते.

शाहरुख खानचा आगामी चित्रपट शाहरुख खानच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, 2023 मध्ये त्याने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डँकी’ असे तीन जास्त कमाई करणारे चित्रपट दिले. आता शाहरुख खान त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याची लेक सुहाना खानही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.