शाहरुख खानचा लेक अबराम मुंबईतील सर्वात महागड्या शाळेत शिकतोय; फीचा आकडा ऐकून धक्काच बसेल
सेलिब्रेटींच्या मुलांबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यात शाहरूख खानचा लेक अबरामची तर सर्वात जास्त चर्चा होताना दिसते. आता तो किती वर्षांचा आहे तसेच तो कोणत्या इयत्तेत शिकत आहे तसेच त्याच्या शाळेची फी किती आहे हे जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता आहे. दरम्यान अबराम हा मुंबईतील सर्वात महागड्या शाळेत शिकतो.

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानप्रमाणेच त्याच्या मुलांचीही आता तेवढीच चर्चा होताना दिसते. त्यात अबरामची चर्चाही होताना दिसते. शाहरूखही त्याच्या किती जवळ आहे हे सर्वांना माहित आहे. दरम्यान अबरामबद्दल चाहत्यांना देखील जाणून घेण्याची उत्सुकता असते. जसं की अबराम किती वर्षांचा आता झाला आहे तसेच कोणत्या शाळेत तो शिकत आहे. कितव्या इयत्तेत शिकत आहे. हे सर्व चाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असते.
मुंबईतील सर्वात महागडी शाळा आहे
अबराम खानच्या शाळेच्या कार्यक्रमातील कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यावेळी शाहरूखही त्याच्या फॅमिलीसोबत कार्यक्रमांना उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. पण अबराम आता कोणत्या शाळेत शिकतो याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. तर अबराम ज्या शाळेत जातो ती मुंबईतील सर्वात महागडी शाळा आहे.
अबराम खानची मुंबईतील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. या शाळेत मुलांना शिक्षण देणे हे अनेकांसाठी अशक्य आहे. याचं कारण म्हणजे या शाळेची असणारी फी. अबराम खान हा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2003 मध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी केली होती.
View this post on Instagram
अबराम 5 व्या इयत्तेत शिकतो अन् त्याची फी जाणून धक्का बसेल
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही बॉलिवूड स्टार्सच्या आवडत्या शाळांपैकी एक मानली जाते. बॉलिवूडमधील तसेच, प्रसिद्ध बिझनेसमनची मुले येथे शिक्षण घेतात. या शाळेत एलकेजी ते 7 वी पर्यंतचे मासिक फीस 170,000 आहे आणि 8 वी ते 10 वी पर्यंतचे फी 590,000 आहे. 11 वी आणि 12 वी पर्यंतची फी ही 965,000 आहे.याशिवाय, अहवालांमध्ये असाही दावा केला आहे की प्रवेशाच्या वेळी, सुरक्षा ठेव म्हणून मोठी रक्कम जमा केली जाते, जी परत करण्यायोग्य आहे.
रिपोर्टनुसार, अबराम 5 व्या इयत्तेत शिकतो आहे. शाहरुख खान दर महिन्याला 1 लाख 70 हजार रुपये फी भरतो. वार्षिक त्याची फी सुमारे 20 लाख 40 लाख रुपये इतकी असते. ही शाळा मुलांना अनेक सुविधा देते. या शाळेत खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, वातानुकूलित वर्गखोल्या, छतावरील बाग आणि टेनिस कोर्ट आहे.
शाहरूखच्या या चित्रपटात अबरामने काम केलं आहे.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल हे सारा अली खान, खुशी कपूर, इब्राहिम अली खान, सुहाना खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, अनन्या पांडे, न्यासा देवगन हे स्टारकिड्सने देखील शिक्षण घेतलं आहे. विशेष म्हणजे अबरामने चित्रपटांमध्येही पदार्पण केले आहे. खरेतर, तो एक वर्षाचा असताना, त्याला त्याचे वडील शाहरुख खानच्या ‘हॅप्पी न्यू ईयर’ चित्रपटात पाहिले गेले होते. होय, शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम याने ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली आहे. अबराम चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या क्रेडिट्समध्ये दिसला, जिथे त्याने त्याची आई गौरी खानसोबत कॅमिओ केला आहे.
