AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 20 वर्षांनी कमबॅक करणारी ही जोडी ! शाहरुख खानच्या किंग मधून धमाकेदार पुनरागमन ?

शाहरुख खानच्या किंग चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता असून तो मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते आतूर आहेत. एक जुनी जोडी या चित्रपटाद्वारे तब्बल 20 वर्षांनी कमबॅक करणार असल्याची सध्या चर्चा आहे..

तब्बल 20 वर्षांनी कमबॅक करणारी ही जोडी ! शाहरुख खानच्या किंग मधून धमाकेदार पुनरागमन ?
Shah Rukh Khan
| Updated on: Sep 07, 2026 | 3:01 PM
Share

अभिनेता शाहरुख खान ( Shah Rukh Khan) याच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘किंग’ (King) चित्रपटाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांचा समावेश असून, त्याबद्दलच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातून एक प्रसिद्ध जोडी तब्बल 20 वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री रानी मुखर्जी यांची.. मिळालेल्या माहितीनुसार, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन, हे दोघेही ‘किंग’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसू शकतात. विशेष म्हणजे, या चित्रपटात दोघे कपलच्या भूमिकेत दिसणार असल्याचीदेखील चर्चा आहे. यापूर्वी 2007 साली आलेल्या ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘बस इतना सा ख्वाब है’ यांसारख्या चित्रपटांमधील अभिषेक-राणीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.

राणी मुखर्जीची भूमिका नेमकी काय?

‘किंग’मध्ये राणी मुखर्जीची भूमिका नेमकी काय असेल, याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ती सुहाना खानच्या आईच्या छोट्या भूमिकेत दिसणार अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, आता ताज्या रिपोर्टनुसार राणीची भूमिका त्यापेक्षा अधिक महत्त्वाची असू शकते. दुसरीकडे, याच चित्रपटात अभिषेक बच्चन हा नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राणी आणि अभिषेक यांची जोडी या चित्रपटाच्या कथानकात कशाप्रकारे दाखवली जाणार, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मिड डे’च्या रिपोर्टनुसार, तब्बल दोन दशकांनंतर प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळू शकते.

स्टारकास्टवर शाहरुखने काय म्हटलं ?

‘किंग’च्या स्टारकास्टमध्ये राणी मुखर्जी असणार का, असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुख खानला सोशल मीडियावरील चॅटदरम्यान विचारला होता. त्यावर शाहरुखने राणी चित्रपटात असो किंवा नसो, दोन्ही परिस्थितीत ती मला आवडते, असं हजरजबाबी उत्तर दिल होतं. एवढंच नव्हे तर, शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांना पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं आणखी एका चाहत्याने म्हटलं होतं. त्यावर शाहरुखनेही ‘मीसुद्धा’ असे उत्तर देत चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवला.

शाहरुखच्या किंगची सर्वांनाच उत्सुकता

शाहरुख खानचा ‘किंग’ हा सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हाय-ऑक्टेन ॲक्शन ड्रामा आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत सुहाना खान, दीपिका पादुकोण, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि अभिषेक बच्चन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखची लेक सुहाना या चित्रपटाद्वारे थिएट्रिकल डेब्यु करणार आहे. तर अभिषेक बच्चन पुन्हा एकदा ग्रे शेडची भूमिका साकारताना दिसणार असल्याने त्याच्या व्यक्तिरेखेबाबतही मोठी उत्सुकता आहे. 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

Follow Us
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा