AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahrukh Khan | शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर प्लास्टिक कव्हर, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर सध्या प्लास्टिक कव्हर टाकल्याचे फोटो व्हायरल होत आहेत (Plastic cover to Shahrukh Khan Bunglow Mannat).

Shahrukh Khan | शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर प्लास्टिक कव्हर, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
दरवर्षी वाढदिवशी तो चाहत्यांना झलक देण्यासाठी त्याच्या गॅलरीमध्ये हजर असतो. मात्र यंदा मन्नतसमोर शुकशुकाट पाहायला मिळत आहे
| Updated on: Jul 22, 2020 | 5:26 PM
Share

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर सध्या प्लास्टिक कव्हर टाकल्याचे फोटो व्हायरल होत आहेत (Plastic cover to Shahrukh Khan Bunglow Mannat). मन्नतवर प्लास्टिक कव्हर टाकण्यानंतर सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या कारणांविषयी देखील तर्कवितर्क लावले जात आहे. मुंबईत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून असे केल्याचाही अंदाज लावला जात आहे.

नुकताच बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर बॉलिवूडसह देशभरातून अनेक प्रतिक्रिया आल्या. आता शाहरुख खानच्या घरावील या प्लास्टिक कव्हरने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. बच्चन कुटुंबीयांसह अनेक सेलिब्रेटींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्यानेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार आता अधिक काळजी घेत असल्याचं बोललं जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, कोरोना हवेतूनही पसरतो असं डब्ल्यूएचओने सांगितल्यानंतर शाहरुख खानने आपलं घर मन्नतवर प्लास्टिक कव्हर टाकण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. शाहरुखच्या घराचा प्लास्टिक कव्हरने झाकलेले फोटो समोर आल्यानंतर अनेकजण कोरोनाच्या भीतीनेच ही उपाययोजना केल्याचं बोलत आहेत. दुसरीकडे मान्सूनच्या जोरदार पावसापासून सुरक्षेसाठी असं केल्याचाही दुसरा अंदाज बांधला जात आहे. सोशल मीडियावर हे फोटो आल्यानंतर शाहरुख खानचे चाहते अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत तुटून पडले आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

शाहरुख खान आपली पत्नी गौरी आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत आपल्या अनेकमजली मन्नत बंगल्यामध्ये राहतो. त्यात प्लास्टिक कव्हरने झाकलेले मन्नतचे फोटो समोर आल्याने त्याच्या आणि कुटुंबीयांविषयी काळजी देखील व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोना संसर्ग झालाय. अशावेळी शाहरुखच्या मन्नतचे प्लास्टिकने झाकलेले फोटो समोर आल्याने अनेक तर्कवितर्क लावले आत आहेत.

हेही वाचा :

Aishwarya Rai Corona | ऐश्वर्या आणि आराध्याही नानावटी रुग्णालयात दाखल

…म्हणून रेखा यांचा ‘कोरोना’ चाचणी करुन घेण्यास नकार

Sara Ali Khan | सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोना, सारासह कुटुंबियांची चाचणी निगेटिव्ह

Plastic cover to Shahrukh Khan Bunglow Mannat

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.