
KKR : अभिनेता शाहरुख खान वर्षाच्या सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका निर्णयामुळे किंग खान याच्यावर टीका होत आहे. शाहरुख खान याने केकेआर टीमसाठी बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला घेतल्याबद्दल वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशात सतत हिंदूंवर अन्याय आहे तर, दुसरीकडे शाहरुख खान याने त्याच्या टीममध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूला संधी दिली आह. याच निर्णयामुळे अडचणी आलेल्य शाहरुख खान विरोधात लोकांमधील संताप वाढताना दिसतोय.
दरम्यान, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शाहरुख खान याला थेट पत्रच लिहिलं आहे. पत्रातून प्यारे खान यांनी केकेआरमधून बांगलादेशी खेळाडूंना दूर ठेवण्याचं शाहरुख खान याला आवाहन केलं आहे. शिवाय अभिनेता अल्पसंख्याक असल्यामुळे देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
प्यारे खान पत्रात म्हणाले, शाहरुख खान भारतात अल्पसंख्याक आहे, त्यामुळे त्यांची सुरक्षा आमची जबाबदारी आहे. इथे काही झालं तर त्यांची सुरक्षा आमची जबाबदारी आहे… अभिनेता शाहरुख खान याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघातून बांगलादेशी क्रिकेटपटूंना दूर ठेवण्याचं आवाहन केलं..
प्यारे खान पुढे म्हणाले, ‘मी शाहरुख खान याला आवाहन करतो की या बांगलादेशी खेळाडूंवर पूर्णतः बंदी घालावी. ज्या देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. तिथल्या अल्पसंख्याक समुदायाची, आपल्या हिंदू बांधवांची जबाबदारीही आपलीच आहे.” सध्या शाहरुख खान त्याच्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
सांगायचं झालं तर, केकेआर संघाने आयपीएल 2026 च्या लिलावात बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान याला 9.2 कोटी रुपयांना खरेदी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर शाहरुख खान याने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
किंग खान याच्या या निर्णयानंतर अभिनेत्याला टीकेचा सामना करावा लागता आहे. बांगलादेशात हिंदूंची हत्या होत असताना आयपीएल लिलावात तिथल्या खेळाडूंना खरेदी केलं जातंय, अशा शब्दांत शाहरुखवर नाराजी व्यक्त केली जात आहे. शाहरुखला भारतात राहण्याचाही अधिकार नाही, अशी टीका त्याच्यावर होत आहे. जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य, बाबा बागेश्वर, देवकी नंदन या धार्मिक व्यक्तींनीही शाहरुख खानच्या निर्णयाचा विरोध केला आहे.