AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शालीन भनोट याच्या पहिल्या पत्नीने गुपचूप उरकला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात

घटस्फोटानंतर शालीन भनोट याच्या पत्नीच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री; गुपचूप साखपुडा उरकल्यानंतर अभिनेत्री लग्नानंतर जाणार परदेशात... कोण आहे अभिनेत्रीचा होणारा पती?

शालीन भनोट याच्या पहिल्या पत्नीने गुपचूप उरकला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात
शालीन भनोट याच्या पहिल्या पत्नीने गुपचूप उरकला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात
| Updated on: Feb 04, 2023 | 12:51 PM
Share

मुंबई : अभिनेता शालीन भोनट (shalin bhanot) सध्या बिग बॉस 16 शोच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी कसून प्रयत्न करत असताना अभिनेत्याला मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. शालीन याची पहिली पत्नी दलजीत कौर (dalljiet kaur) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. शालीन याच्यासोबत पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. दलजीत कौर हिचा बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दलजीत कौर मार्च महिन्यात दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र दलजीत कौर हिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगत आहे. (shalin bhanot ex wife)

शालिन याची पहिली पत्नी दलजीत कौर यूके मधील एका व्यक्तीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दलजीत कौर हिच्या होणाऱ्या पतीचं नाव निखिल पटेल असं आहे. लग्नानंतर दलजीत कौर लंडनमध्ये राहणार आहे. लग्नानंतर दलजीत कौर तिच्या मुलाला देखील लंडन मध्ये घेवून जाणार आहे. खुद्द दलजीत कौर हिने सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या नव्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

कोण आहे दलजीत कौर हिचा होणारा पती?

दलजीत कौर हिचा होणारा पती निखिल पटेल (nikhil patel) एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो. लग्नानंतर दलजीत कौर तिच्या आणि शालीनचा मुलगा जेडन याला देखील यूकेमध्ये घेवून जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये लग्न होणार आहे. लग्नानंतर काही दिवस दलजीत कौर नैरोबी (अफ्रीका) याठिकाणी राहणारा आहे. कारण निखिल सध्या नैरोबी याठिकाणी काम करत आहेत. त्यानंतर दलजीत कौर नव्या कुटुंबासोबत लंडन याठिकाणी शिफ्ट होणार आहे.

दलजीत कौर ही सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. दलजीत कौर हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. दलजीत कौर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. दलजीत कौर इन्स्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

दलजीत कौर आणि शालीन भनोट याचं नातं दलजीत कौर आणि शालीन भनोट यांनी लग्नानंतर ६ वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दलजीत कौर आणि शालीन भनोट यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव जेडन असं आहे. लग्नानंतर काही वर्षात त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. नातं सुधारण्यासाठी दोघांना एकमेकांना अनेक संधी देखील दिल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

एवढंच नाहीतर, दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं दलजीतने सांगितलं. शिवाय बिग बॉसमध्ये देखील अभिनेत्री टीना दत्ताने शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं सांगितलं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.