AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्विमिंग पूलमध्ये कपलसोबत मगर, कथा अशी की प्रेक्षक घाबरले, आता चित्रपट OTT वर ट्रेंडमध्ये

आपण एका अशा थ्रिलर चित्रपटाबद्दल बोलत आहोत जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, पण ओटीटीवर येताच हिट झाला आणि त्याचे आयएमडीबी रेटिंगसुद्धा अप्रतिम आहे.

स्विमिंग पूलमध्ये कपलसोबत मगर, कथा अशी की प्रेक्षक घाबरले, आता चित्रपट OTT वर ट्रेंडमध्ये
Tu yaa MaiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 14, 2026 | 7:45 PM
Share

आजकाल अनेकांचा घसबरल्या सिनेमे पाहण्याकडे कल असतो. अनेकजण ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवा काय कंटेन्ट येतोय का? हे पाहात असतात. तसेच सोशल मीडियावर देखील एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या चर्चेविषयी ऐकून तो देखील पाहतात. सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या एका चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत हा चित्रपट आता नंबर १ वरून खाली सरकून टॉप ५ मध्ये आला आहे. अशा वेळी आज आपण नेटफ्लिक्सवर सध्या टॉप ट्रेंड करणाऱ्या एका चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता, पण ओटीटीवर येताच कमाल केली आहे.

हा चित्रपट एक सर्व्हायव्हल थ्रिलर आहे. यात स्टार किड शनाया कपूरला मुख्य भूमिकेत घेण्यात आले आहे. शनाया अजूनपर्यंत एकही हिट चित्रपट देऊ शकलेली नाही. तिने विक्रांत मेसीच्या ‘आंखों की गुस्ताखियां’ या चित्रपटातून डेब्यू केला होता, पण या चित्रपटालाही तिच्या फारसे यश मिळाले नाही.

नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंग चित्रपटाचे नाव

शनाया कपूरचा जो चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड करत आहे, तो म्हणजे ‘तुम या मै.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन बेजॉय नाम्बियार यांनी केले आहे. चित्रपटाची कहाणी आला फ्लोपारा आणि मिस व्हॅनिटी या दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरभोवती फिरते. दोघ एकमेकांच्या प्रेमात आहेत, पण मॉन्सूनमध्ये ते एका पूलमध्ये अडकतात. त्यानंतर त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना मगरीचा सामना करावा लागला. चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतात.

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली

शनाया कपूरचा ‘तुम या मै’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. Sacnilk रिपोर्टनुसार, भारतातील नेट कलेक्शन फक्त ७.३१ कोटी आणि ग्रॉस कलेक्शन ८.४७ कोटी एवढेच राहिले. हा शनायाचा दुसरा फ्लॉप चित्रपट ठरला आहे. यापूर्वी तिचा पहिली चित्रपट ‘आंखों की गुस्ताखियां’ देखील बॉक्स ऑफिसवर वाईट प्रकारे फ्लॉप झाला होता.

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.