AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्त्रायलला सर्वात मोठा धक्का, नेतन्याहू बॅकफूटवर, बड्या देशाच्या तडाकाफडकी घोषणेमुळे जगभरात मोठी खळबळ

युद्धविरामाची घोषणा झाली आहे, मात्र तरी देखील अद्याप मध्य पूर्वेत तणाव कायम आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली असून, इस्त्रायलला मोठा धक्का बसला आहे. बड्या देशाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

इस्त्रायलला सर्वात मोठा धक्का, नेतन्याहू बॅकफूटवर, बड्या देशाच्या तडाकाफडकी घोषणेमुळे जगभरात मोठी खळबळ
benjamin netanyahuImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 7:20 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इरणमध्ये 39 दिवस भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये इराणचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे, इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल हल्ल्यानं अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला आहे. या हल्ल्यांमध्ये इस्त्रायलचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान त्यानंतर युद्धाच्या 40 व्या दिवशी अखेर युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूजवर तोडगा निघू शकलेला नाहीये. त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इस्त्रायलला मोठ धक्का बसला आहे.

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इटलीने इस्त्रायलला मोठा धक्का दिला आहे. इटलीने इस्त्रायलसोबतचा आपला संरक्षण करार तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारांतर्गंत दोन्ही देशांमध्ये शस्त्रास्त्र आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाची देवान घेवान सुरू होती, मात्र आता इटलीने मोठा निर्णय घेतला असून, इटलीकडून हा करार तडकाफडकी निलंबित करण्यात आला आहे. हा इस्त्रायलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली आहे. इटलीची वृत्तसंस्था एएनएसए अनुसार वर्तमान स्थिती पहाता आता आम्ही इस्त्रायलसोबतच्या संरक्षण कराराचं नुतनीकरण करू शकत नाही, त्यामुळे हा करार आता निलंबित करण्यात येत आहे, असं मेलोनी यांनी म्हटलं आहे. इटलीच्या राजकीय सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार सध्या युद्धामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. की धोरणात्मक स्थरावर शस्त्रास्त्राचं आदान प्रदान करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे हा करार रद्द करण्याचा निर्णय इटलीने घेतला आहे. हा इस्त्रायलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

इस्त्रायलचा भारताला फोन 

दरम्यान दुसरीकडे आज इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला. यावेळी त्यांनी स्ट्रीट ऑफ होर्मजू, लेबनॉन आणि मध्य पूर्वेत सुरू असलेल्या घडामोडींची भारताला माहिती दिली आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?