Sharad Ponkshe: ‘शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही’; आदेश बांदेकरांना दिलं सडेतोड उत्तर

एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावर अभिनेता आणि शिवसेना कार्यकर्ते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्यातील वाद पहायला मिळाला. आदेश यांनी शरद यांच्या एका जुना मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत ‘हा शरद पोंक्षे तूच ना?', असा सवाल केला.

Sharad Ponkshe: 'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही'; आदेश बांदेकरांना दिलं सडेतोड उत्तर
Sharad Ponkshe and Aadesh Bandekar
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 28, 2022 | 9:47 AM

एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावर अभिनेता आणि शिवसेना कार्यकर्ते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्यातील वाद पहायला मिळाला. आदेश यांनी शरद यांच्या एका जुना मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’, असा सवाल केला. त्यावर आता सोशल मीडियावरूनच शरद पोंक्षेंनी उत्तर दिलं आहे. आपल्या पुस्तकातील फोटो पोस्ट करत ‘शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही’, असं त्यांनी म्हटलंय. शरद पोंक्षेंनी कॅन्सरवर मात करण्याच्या प्रवासावर नुकतंच एक पुस्तक प्रकाशित केलंय. दुसरं वादळ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात शरद पोंक्षेंसोबत एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) एक फोटोही छापला आहे. कॅन्सरच्या काळात एकनाथ शिंदेंनी केलेल्या मदतीबद्दल सांगत पोंक्षेंनी फेसबुकवर तो फोटो पोस्ट केला. यावरून बांदेकरांना गैरसमज झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘मित्रा आदेश पुस्तक वाच, ज्यात ज्याने मदत केली त्या प्रत्येकाचे आभार मानलेत मी. मी तोच शरद पोंक्षे आहे, प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा. मी कधीच काहीही विसरलेलो नाही. विसरणारही नाही. पक्षापलीकडची मैत्री आहे आपली,’ असं उत्तर त्यांनी आधी आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर दिलं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पुस्तकातील एका पानाचा फोटो पोस्ट केला. त्या पानावर बांदेकरांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही,’ असं कॅप्शनमध्ये लिहित त्यांनी हे पान पोस्ट केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

व्हिडीओत पोंक्षे काय म्हणाले?

“सगळ्यात पहिला धावून आला तो आदेश बांदेकर. आदेश म्हणाला काळजी करू नकोस तू. डॉक्टर नांदेकडे त्याने मला पाठवलं. मी आदेशला फोन केला, की असं असं सांगतायत रे, अशी शक्यता आहे, तर काय करू, मला खूप टेन्शन आलंय. तो म्हणाला, काळजी करू नको, उद्याच्या उद्या मी तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीमधले ते खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवल्यानंतर सगळ्या प्रोसेरला सुरुवात झाली. पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. उद्धव ठाकरेंचा लगेच फोन आला, की शरद काळजी करू नकोस. शिवसेना आणि मी, अख्खी शिवसेना तुझ्या पाठिशी उभी आहे. पैशापासून कसलीही काळजी करायची नाही,” असं ते म्हणतायत. यावरूनच बांदेकरांनी नाराजी व्यक्त करत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

शरद पोंक्षेंनी आपल्या पुस्तकात काय लिहिलं?

‘मी आणि विवेक बाहेर आलो, काहीच कळेना. आता डॉक्टर कसा शोधायचा? आणि एकदम आदेश बांदेकरची आठवण झाली. हा असा एक जिवलग मित्र आहे की संकटसमयी त्याची आठवण येते. फक्त मलाच नाही तर अनेक कलावंतांना. त्याची खासियत ही आहे की सर्वांसाठी तो मदतीला धावून जातो. आदेशला फोन केला, तो त्याच्या कुटुंबासोबत देवदर्शनाला गेलो हात. तुळजापूरच्या मंदिरात. मला म्हणाला अर्ध्या तासात फोन करतो. मी आणि विवेकने तिथेच त्याच्या फोनची वाट बघितली. 40 मिनिटानंतर त्याचा फोन आला तो सरळ उत्तर घेऊनच. मला म्हणाला, दादरला हिंदू कॉलनीत डॉ. श्रीखंडेंचं क्लिनीक आहे. तिथे त्यांचे जावई डॉ. आनंद नांदे आहेत त्यांना भेट. लगेच उद्या दुपारी 12 ची वेळ घेतलीये, तू जाऊन भेट. इतक्या तत्परतेने आदेशने कुटुंबासोबत देवदर्शन करत असूनही डॉक्टर नांदेसोबत बोलून माझी भेट ठरवली. असा हा आदेश, सहृदयी माणूस’, असं पोंक्षेंनी आपल्या पुस्तकात लिहिलंय.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें