49 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकून आजही डोळ्यात येते पाणी, नवीन जोडप्यांचं आवडतं, आजही लोक वेळ काढून ऐकतात

49 वर्षांपूर्वीचं ते गाणं ऐकून आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात येतं पाणी. नवीन जोडप्यांचं आहे सर्वात आवडतं. कोटींमध्ये आहेत व्ह्यूज. तुम्ही ऐकलं का?

49 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकून आजही डोळ्यात येते पाणी, नवीन जोडप्यांचं आवडतं, आजही लोक वेळ काढून ऐकतात
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 23, 2026 | 12:28 PM

1977 Sad Song:  बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी आजही सोशल मीडियावर चर्चेत असतात. मात्र, काही गाणी ही इतकी प्रेक्षकांना भावतात की लोकांना अश्रू अनावर होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाण्याबद्दल सांगणार आहोत. जे गाणं ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार कलाकार म्हणून शशी कपूर यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेली मोहकता, अभिनय आणि रोमँटिक नायकाची प्रतिमा यामुळे ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. आजही त्यांच्या अनेक चित्रपटांतील रोमँटिक प्रसंग आणि गाणी प्रेक्षकांच्या स्मरणात ताजी आहेत.

1977 मधील अजरामर गाणं

आज आपण अशाच एका गाजलेल्या चित्रपटातील अजरामर गाण्याविषयी बोलणार आहोत. 1977 साली प्रदर्शित झालेला रोमँटिक-क्राईम चित्रपट ‘मुक्ती’ त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरला होता. ‘मुक्ती’ या चित्रपटाची कथा त्या काळातील बदलत्या सामाजिक वास्तवावर आधारित होती. एका श्रीमंत कुटुंबातील नायक  ज्याची भूमिका शशी कपूर यांनी साकारली. अधिकाधिक पैसा कमावण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित असतो. तर दुसरीकडे नायिका आपल्या स्वाभिमान, सन्मान आणि सत्यासाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असते.

नोक-झोंक, मतभेद आणि भांडण यातून पुढे सरकत ही कथा अशा प्रेमकथेचे रूप घेते. जिथे प्रेमासोबतच प्रतिष्ठा आणि अहंकार यांचीही मोठी भूमिका असते. 70 च्या दशकात ही संकल्पना प्रेक्षकांना खूप भावली आणि त्यानंतर अशाच कथा असणारे अनेक चित्रपट बनवण्यात आले.

गाण्यांनी सजलेली अजरामर कहाणी

49 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनेक उत्कृष्ट गाणी होती, जी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. मात्र, या सर्व गाण्यांमध्ये एक गाणं विशेष ठरलं ते म्हणजे ‘सुहानी चांदनी रातें’.

‘सुहानी चांदनी रातें’ या दुःखद गीतात शशी कपूर यांनी साकारलेली भावनिक भूमिका आजही प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणते.  आजही हे गाणं यूट्यूब आणि संगीत प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात ऐकलं जात असून या गाण्याला मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नव्या पिढीलाही हे गाणं तितकंच भावत असल्याचं यातून स्पष्ट होतं. आजही जेव्हा हे गाणं ऐकू येतं, तेव्हा जुन्या आठवणी, हरवलेलं प्रेम आणि त्या काळातील चित्रपटाची जादू पुन्हा एकदा जिवंत होते.