AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sheena Bora मर्डर केसवर येणार सीरिज; हत्येचं रहस्य आजही उलगडलेले नाही

देशातील सर्वात धक्कादायक मर्डर मिस्ट्रीपैकी एक असलेल्या शीना बोरा हत्याकांडावर एक वेब सीरिज बनवली जाणार आहे. पण शीना बोरा हत्याकांडाचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही.

Sheena Bora मर्डर केसवर येणार सीरिज;  हत्येचं रहस्य आजही उलगडलेले नाही
| Updated on: Mar 22, 2023 | 3:05 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मर्डर मेस्ट्री, खळबळजनक घटना, मोठे अपघात आणि ऐतिहासिक घटनांवरील वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक सत्य घटनांवर आधारित सीरिज साकारण्यात आल्या आणि त्यांची चर्चा देखील तुफान रंगली.आता मुंबईतील खळबळजनक शीना बोरा हत्याकांडावर एक वेब सीरीज बनवली जाणार आहे. ही वेब सीरिज पत्रकार संजय सिंग यांच्या ‘एक थी शीना बोरा’ या पुस्तकावर आधारलेली असणार आहे. सध्या सर्वत्र शीना बोरा हिच्या हत्याकांडाची चर्चा रंगत आहे.

२०१५ साली घडलेल्या शीना बोरा हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. टीव्ही चॅनल, वर्तमानपत्रात सर्वत्र फक्त आणि फक्त बोरा कुटुंबाची चर्चा होती. बोरा कुटुंबातील नात्याचा गुंता तुफान चर्चेत आला होता. घटना घडल्यानंतर सर्वत्र शीना बोरा हत्याकांडा विषयी चर्चा रंगली होती. आता हत्याकांडावर आधारित सीरिज येणार असल्यामुळे शीनाची हत्या नक्की कशी झाली हे कळू शकतं. पण महत्त्वाचं म्हणजे हत्येचा उलगडा अद्याप झालेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी हिचा पहिला पती सिद्धार्थ दास यांची शीना मुलही होती. पण इंद्राणी हिने दुसरा पती (घटस्फोटित) संजीव खन्ना आणि तिच्या ड्रायव्हरच्या मदतीने शीनाची हत्या केली असल्याची माहिती समोर आली होती. शीना बोरा हत्या प्रकरणी इंद्रायणी हिला तुरुंगात देखील रहावं लागलं.

इंद्रायणी हिचं तिसरं लग्न उद्योजक पीटर मुखर्जी याच्यासोबत लग्न झालं होतं. पीटर मुखर्जी आणि त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहूल याच्यासोबत शीनाने लग्न करावं अशी इंद्रायणी हिची इच्छा होती. या प्रकणात नात्याची प्रचंड मोठी गुंतागूंत आहे. अखेर सीरिजच्या माध्यमातून कोणतं सत्य समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत संजय सिंग? लेखक संजय सिंग प्रसिद्ध पत्रकार आहेत. लेखक संजय सिंह यांनी देशातील प्रतिष्ठित माध्यमांमध्ये काम केलंआहे. हजारो कोटी रुपयांच्या तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचं श्रेय देखली संजय सिंह यांना जातं. त्यांनी या घोटाळ्यावर ‘स्कॅम 2003 : तेलगी स्टोरी’ पुस्तक देखील लिहिलं. एवढंच नाही तर, ‘स्कॅम 2003 : तेलगी स्टोरी’ पुस्तकावर सीरिज देखील साकारण्यात आली आहे. सीरिज लवकरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.