AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेफाली जरीवालाने मृत्यूपूर्वी ठेवलं होतं हे व्रत; उपाशी पोटीच तिने घेतलं होतं हे इंजेक्शन

शेफाली जरीवालाच्याबाबत अजून एक माहिती समोर आली आहे की, मृत्यूपूर्वी तिने एक व्रत ठेवलं होतं. आणि तिने उपाशी पोटीच एक इंजेक्शन घेतलं होतं.

शेफाली जरीवालाने मृत्यूपूर्वी ठेवलं होतं हे व्रत; उपाशी पोटीच तिने घेतलं होतं हे इंजेक्शन
Shefali Jariwala Death, Fasting, Injection,Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2025 | 4:18 PM
Share

अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे 27 जूनच्या मध्यरात्री निधन झाले. या बातमीने चाहत्यांना तसेच संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. शेफालीच्या अचानक निधनाची बातमी ऐकून कुटुंब आणि मित्रांसह अनेक सेलिब्रिटी शोकाकुल झाले आहेत. आज 28 जून रोजी या अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिला कार्डियाक अरेस्टमुळे तिचे निधन झाल्याचं बोललं जातं आहे. परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप आलेला नाही.

अशा परिस्थितीत, अभिनेत्रीच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप कळलेले नाही. दरम्यान, शेफाली जरीवालाच्या मृत्यूशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका वृत्तानुसार, अंबोली पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी यासंबंधी अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, त्यांना तपासात काही महत्त्वाचे तथ्य सापडले आहेत.

अभिनेत्रीने रिकाम्या पोटी इंजेक्शन घेतले का? शेफाली अनेक वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी औषधे घेत होती. अहवालानुसार, अभिनेत्रीच्या कुटुंबाने 27 जून रोजी घरी पूजाही ठेवली होती. ज्यासाठी शेफालीने उपवासही केला होता.उपवास असल्याने ती दिवसभर उपाशी होती. त्यातच दुपारी तिने तरुण दिसण्यासाठी जी ट्रीटमेंट घेत होती त्याच औषधाचे एक मोठे इंजेक्शन घेतले. अशा परिस्थितीत, आता पोलिस तपासात, अधिकारी शेफालीला आलेल्या कार्डियाक अरेस्टचे प्रमुख कारण मानलं जात आहेत. तथापि, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच खरा खुलासा होईल.

27 जून रोजी नेमकं काय घडलं? अहवालानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 27 जूनच्या रात्री शेफाली अचानक थरथर कापू लागली आणि जमिनीवर पडली. त्यावेळी तिचा पती आणि कुटुंबातील इतर सदस्य घरी उपस्थित होते. त्याच वेळी, पोलिसांच्या एफएसएल टीमला शेफालीच्या घरातून औषधे सापडली आहेत, ज्यामध्ये तरुण दिसण्यासाठीची औषधे, सौंदर्य तेल आणि गॅस्ट्रोशी संबंधित औषधे समाविष्ट आहेत.

पोस्टमॉर्टेम रिपोर्ट जपून ठेवला दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना त्यांना सांगितले की, “शवविच्छेदन करण्यात आले आहे, परंतु मृत्यूच्या कारणाबद्दलचा रिपोर्ट राखून ठेवण्यात आले आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे दिसून येत आहे आणि त्यात कोणताही गैरप्रकार झाला नाही.” याशिवाय, एएनआय वृत्तसंस्थेनुसार, शेफाली जरीवालाचे शवविच्छेदन केल्यानंतर, तिचा अहवाल आता सुरक्षित ठेवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (एमसीजीएम) मते , राज्य सरकारच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले होते. डॉक्टरांनी त्यानी हा रिपोर्टबाबत मौन बाळगले आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.