AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहनाज गिलने कथित बॉयफ्रेंडसोबत घेतलं बद्रिनाथचं दर्शन? व्हिडीओतून पोलखोल

गेल्या काही दिवसांपासून राघव आणि शहनाज यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, असंही म्हटलं जात होतं. त्यानंतर आता बद्रिनाथमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राघवसोबत शहनाजसारखी एक मुलगी दिसून येत आहे.

शहनाज गिलने कथित बॉयफ्रेंडसोबत घेतलं बद्रिनाथचं दर्शन? व्हिडीओतून पोलखोल
शहनाज गिल, राघव जुयालImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2023 | 12:21 PM
Share

मुंबई : 14 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री शहनाज गिल सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय. सोशल मीडियावर ती चाहत्यांसोबत या सुट्ट्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय. या फोटो आणि व्हिडीओमध्ये जरी ती एकटी दिसत असली तरी शहनाज तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत फिरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर शहनाज तिच्या ट्रिपमध्ये एकटीच नसल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत. शहनाजचा हा कथित बॉयफ्रेंड दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता आणि डान्सर राघव जुयाल असल्याचं म्हटलं जात आहे.

शहनाजने सोशल मीडियावर बद्रिनाथ दर्शनाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाचा जॅकेट, टोपी आणि गळ्यात शॉल घातल्याचं पहायला मिळत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये राघव जुयालसुद्धा बद्रीनाथचं दर्शन घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राघवच्या बाजूला उभी असलेली तरुणी ही हुबेहूब शहनाजच्या वेशभूषेत असल्याचं दिसत आहे. मात्र तिने शॉलने आपला चेहरा झाकला आहे. असं असलं तरी त्या तरुणीचे आणि शहनाजचे कपडे अगदी सारखेच आहेत. या व्हिडीओमुळेच पुन्हा एकदा राघव आणि शहनाजच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

शहनाज आणि राघवच्या अफेअरची चर्चा याआधीही होती. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र चित्रपटानंतर दिलेल्या मुलाखतीत राघवने शहनाजसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा फेटाळल्या होत्या.

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत राघव म्हणाला होता, “इंटरनेटवरील गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत मी स्वत: ते पाहत नाही किंवा ऐकत नाही, तोपर्यंत ते खरं आहे की खोटं ते मला माहीत नाही. मी इथे चित्रपटासाठी आलो आहे आणि मला लोकांनी एक अभिनेता, डान्सर आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखावं अशीच माझी इच्छा आहे. मी कामातून व्यक्त होतो. बाकी या सर्व गोष्टी (डेटिंगच्या चर्चा) असो किंवा नसो.. आणि हे सर्व शक्यच नाही. कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही. मी डबल शिफ्टमध्ये काम करतो. सध्या माझी परिस्थिती अशी आहे की या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नाही.”

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना