AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा बनली आई? म्हणाली ‘एक असा आशीर्वाद..’

अभिनेत्री शर्लिन चोप्रा आई झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामागचं कारण म्हणजे तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले काही फोटो. त्याचसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्येही ती बाळासोबत दिसल्याने या चर्चा होऊ लागल्या आहेत.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा बनली आई? म्हणाली 'एक असा आशीर्वाद..'
Sherlyn ChopraImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 30, 2025 | 2:42 PM
Share

अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच शर्लिनला एका लहान बाळासोबत पाहिलं गेलं. तिचा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हे बाळ कोणाचं आहे, शर्लिन बाळासोबत का फिरतेय, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. शर्लिनने बाळाला दत्तक घेतल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चांवर तिने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. बुधवारी शर्लिनला मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटमधून लहान बाळासोबत बाहेर येताना पापाराझींनी पाहिलं. तेव्हापासून या चर्चांची सुरुवात झाली आहे.

शर्लिनने या बाळासोबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘एक असा आशीर्वाद ज्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. त्यामुळे शर्लिन बाळाला दत्तक घेऊन आई बनली का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या बाळाचं नाव किंवा त्याबद्दलची कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये पापाराझी तिला ‘मम्मी’ असंही बोलताना दिसत आहेत. त्यावरही ती कोणतीच नकारात्मक प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे बाळाला दत्तक घेऊन ती खरंच आई बनल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

याआधी दिलेल्या काही मुलाखतींमध्ये शर्लिन मातृत्वाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मला आई बनायचं आहे आणि त्यासाठी भारतात कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, याबद्दल मी जाणून घेतेय. मला किमान तीन ते चार मुलंबाळं हवी आहेत. माझ्या बाळाला मी ‘अ’ या अक्षरावरून नाव देईन. कारण मला हे अक्षर खूपच आवडतं”, असंदेखील ती म्हणाली होती.

शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलंय. 2007 मध्ये ‘रेड स्वस्तिक’ या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अमेरिकन ‘प्लेबॉय’ या मॅगझिन कव्हरवर फोटो झळकल्याने ती प्रकाशझोतात आली होती. शर्लिनने ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला’च्या सहाव्या सिझनचं सूत्रसंचालनसुद्धा केलंय. 2009 मध्ये तिने ‘बिग बॉस’मध्येही भाग घेतला होता.

आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.