Shilpa Shetty: राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य

Shilpa Shetty: 'महाराष्ट्रातील 1.5 कोटींहून अधिक महिलांना आता...', राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेवर शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य, अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Shilpa Shetty: राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य
| Updated on: Aug 20, 2024 | 1:41 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील दीड कोटींपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांच्यांपैकी अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु केल्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दर महिन्याला 1500 रुपयांप्रमाणे प्रत्येक महिलेच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. रक्षबंधन सणाच्या निमित्ताने राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. ज्यामुळे यंदाची रक्षाबंधन महिलांसाठी खास ठरली आहे.

राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने देखील मोठं वक्तव्य केलं आहे. शिल्पा हिने एक्स (ट्विटर) अकाउंट वरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. सध्या अभिनेत्रीचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चं कौतुक करत शिल्पा म्हणाली, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सत्यात उतरली आहे, जे पाहणं अविश्वसनीय आहे! महाराष्ट्रातील 1.5 कोटींहून अधिक महिलांना आता दर महिन्याला आर्थिक हातभार लाभणार आहे.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा अनेक महिलांना होण्यास सुरुवात झाली आहे. याचा मला आनंद आहे. राज्य सरकारने घेतलेला मोठा निर्णय म्हणजे म्हणजे महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

शिल्पा शेट्टी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत शिल्पा शेट्टी हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज शिल्पा पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर शिल्पा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.