AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याचं वैवाहिक आयुष्य आनंददायी नसल्यामुळे…, शिल्पा शेट्टी होती विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात, कमी लोकांना माहितेय ‘हे’ प्रकरण

Shilpa Shetty Love Life: 'अक्षय कुमारने माझा वापर केला आणि...', खिलाडी कुमारसोबत ब्रेकअप होतात शिल्पाच्या आयुष्यात दिग्दर्शकाची एन्ट्री, पण तो विवाहित असल्यामुळे..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

त्याचं वैवाहिक आयुष्य आनंददायी नसल्यामुळे..., शिल्पा शेट्टी होती विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात, कमी लोकांना माहितेय 'हे' प्रकरण
| Updated on: Jan 27, 2025 | 3:01 PM
Share

Shilpa Shetty Love Life: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत शिल्पाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सांगायचं झालं शिल्पाचं प्रोफेशनल आयुष्य नाही तर, खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिलं. शिल्पा आता पती राज कुंद्रा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा शिल्पाचं नाव अनेकांसोबत जोडलं जात होतं.

बॉलिवूडमध्ये काम करत असताना शिल्पा शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. पण अक्षय याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पा पूर्णपणे कोलमडून गेली होती. यावर शिल्पाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता.

अभिनेत्री म्हणाली होती, ‘अक्षयने माझा फक्त वापर केल. दुसरी व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर त्याने मला सोडलं… अक्षय माझ्यासाठी कायम खास राहिला, पण असं काही होईल याचा मी कधी विचार देखील केला नाही…’ अक्षयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पाने अनेक अडचणींचा सामना केला.

अक्षयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पाच्या आयुष्यात दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची एन्ट्री झाली. ‘दस’ सिनेमाचं शुटिंग सुरु असताना अनुभव आणि शिल्पा यांचं नातं घट्ट झालं. पण तेव्हा अनुभव विवाहित असून बाप देखील होता. एक काळ असा देखील होता जेव्हा शिल्पा आणि अनुभव यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.

पण मुलाखतीत रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. अनुभव आणि माझ्यात चांगली मैत्री आहे… असं शिल्पा म्हणाली होती. मात्र शिल्पाच्या आयुष्यात एक असं वळण आलं जेव्हा अभिनेत्री यशाच्या शिखरावर पोहोचली. 2007 मध्ये शिल्पाने ‘बिग ब्रदर’ शोमध्या भाग घेतला आणि शो जिंकला. शो जिंकल्यानंतर शिल्पाने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा याच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता असं आहे. राज कुंद्रा आणि कविता यांना एक मुलगी देखील आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शिल्पा कायम मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा