‘प्रचंड घाणेरडी बाई…’, लोकांच्या निशाण्यावर सानिया मिर्झाची सवत, नक्की काय आहे प्रकरण?

Shoaib Maalik wife Sana Javed: 'प्रचंड घाणेरडी बाई...', सानिया मिर्झाच्या सवतीला नको ते का बोलत आहे लोकं..., शोएब मलिकची तिसरी बायको अनेकांच्या निशाण्यावर..., सना जावेद कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत

प्रचंड घाणेरडी बाई..., लोकांच्या निशाण्यावर सानिया मिर्झाची सवत, नक्की काय आहे प्रकरण?
फाईल फोटो
| Updated on: Mar 23, 2025 | 1:45 PM

Shoaib Maalik wife Sana Javed: माजी टेनिसपटू सानिया मिर्झा केवळ तिच्या खेळामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया अधिक चर्चेत आली. सानिया मिर्झाला घटस्फोट दिल्यानंतर शोएब मलिक याने तिसरं लग्न पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत केलं. पण आता अनेकांना सानिया हिच्या सवतीवर निशाणा साधला आहे. एका शोमध्ये सना हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सनाला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

नुकताच, सनाने पाकिस्तानमधील एका लाइव्ह टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटर सर्फराज अहमद देखील तिच्यासोबत होता. शोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सना जावेद सरफराजसोबत खूप वाईट वागताना दिसत आहे. ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. सना जावेद हिच्या वागणुकीमुळे सोशल मीडिया यूजर्सने शोएब मलिकला ट्रोलही करायला सुरुवात केली.

 

 

नक्की काय आहे प्रकरण?

सध्या सोशल मीडियावर ज्या शोचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये क्रिकेटर सर्फराज अहमद देखील आहे. दोघांमध्ये एक गेम होतो. त्या गेमचं नावा आहे ‘डिब्बा खोलो…’, गेम सर्फराज त्यांच्या अंदाजात खेळत असताना सना जावेद क्रिकेटरला म्हणते, ‘असं वाटतं की कोणी तुला चावी दिली आहे. त्यामुळे बडबड करत आहे…’

यावर सर्फराज म्हणतो, ‘जिथे खेळ खेळायचा होते तिथे तर खेळली नाही.’ सर्फराज असं म्हणाल्यानंतर सना देखील थांबणारी नव्हती, ती म्हणाली, ‘मी माझ्या नवऱ्यासोबत हवा तसा खेळ खेळेल…’ सध्या शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कमेंटमध्ये अनेकांना सनाचा विरोध केला आहे.

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हिला जराही मोठ्यासोबत बोलण्याची अक्कल नाही.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘प्रचंड घाणेरडी बाई आहे ही..’ सध्या सर्वत्र सना जावेद हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.