50 Years Of Sholay: नाणं, क्लायमॅक्स ते अख्खं गाव..; ‘शोले’बद्दलच्या या 10 रंजक गोष्टी एकदा वाचाच!
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, अमजद खान यांचा 'शोले' हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतो, रडवतो आणि 50 वर्षांनंतरही मैत्रीचं महत्त्व शिकवतो. प्रेक्षकांना आजही या चित्रपटातील प्रत्येक पात्र आणि डायलॉग्स आठवतात.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जर कोणता चित्रपट अमर झाला असेल, तर तो ‘शोले’ आहे. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चाहत्यांसाठी फक्त एक चित्रपट नसून, ती एक भावना आहे. जय-वीरूच्या मैत्रीचं उदाहरण असो, बसंतीचा डायलॉग असो, गब्बर सिंगची क्रूरता असो किंवा ठाकूरचा सूड असो.. ‘शोले’मधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. सलीम-जावेद यांनी लिहिलेले संवाद आणि रमेश सिप्पी यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट आज 50 वर्षांनंतरही प्रेक्षक त्याच उत्साहाने पाहतात. अनेकांना या क्लासिक चित्रपटाबद्दलची प्रत्येक गोष्ट माहीत असल्याचं वाटतं. परंतु ‘शोले’च्या पडद्यामागील काही रंजक गोष्टी फार क्वचित लोकांना ठाऊक असतील. ...
