AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिशान कारनंतर आता श्रद्धा कपूरने खरेदी केलं लक्झरी अपार्टमेंट; किंमत ऐकून धक्का बसेल

श्रद्धा कपूरने तिचे वडील शक्ती कपूर यांच्यासोबत मुंबईत एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या घरासाठी श्रद्धाने प्रचंड पैसा खर्च केल्याचं म्हटलं जात आहे.

आलिशान कारनंतर आता श्रद्धा कपूरने खरेदी केलं लक्झरी अपार्टमेंट; किंमत ऐकून धक्का बसेल
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jan 21, 2025 | 7:24 PM
Share

2024 मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे . या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. श्रद्धा तिच्या अभिनयासोबतच तिच्या खासगी आयुष्याबद्दलही तेवढीच चर्चेत असते. मध्यंतरी श्रद्धाने आलिशान कार खरेदी केली होती आता तिने लक्झरी अपार्टमेंट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. या घरासाठी तिने खूप पैसा खर्च केल्याचं म्हटलं जातं आहे.

वडिलांसोबत श्रद्धा कपूरने घेतलं करोडोंचं घर

श्रद्धा कपूरने तिचे वडील शक्ती कपूर यांच्यासोबत हे नवीन घर घेतले आहे. श्रद्धाचे हे नवीन घर मुंबईत आहे. 13 जानेवारी 2025 रोजी घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. ही मालमत्ता खरेदी केल्यानंतर श्रद्धा या घरात शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका रिपोर्टनुसार, श्रद्धाचे नवीन अपार्टमेंट मुंबईतील जुहू येथील सर्वात उच्च श्रेणीतील पीरामल महालक्ष्मी साऊथ टॉवरमध्ये आहे. हे कॉम्प्लेक्स रेस कोर्स आणि अरबी समुद्राच्या अद्भुत दृश्यासाठी ओळखले जाते. लक्झरी अपार्टमेंट खरेदी करणाऱ्यांसाठी ही इमारत पहिली पसंती आहे.

किती कोटींचे घर घेतले?

पीरामल महालक्ष्मी साउथ टॉवर बिल्डिंगमध्ये 2BHK आणि 3BHK फ्लॅट आहेत, जे उच्चभ्रू वर्गातील ग्राहकांना लक्षात घेऊन बांधले गेले आहेत. रिअल इस्टेट कंपनी जैपकीद्वारा ऍक्सेस केलेल्या कागदपत्रांनुसार, अभिनेत्रीचे नवीन घर 1042.73 स्क्वेअर फूट कार्पेट एरियामध्ये पसरले आहे, ज्यामध्ये दोन मोठ्या बाल्कनी आहेत. या अपार्टमेंटमध्ये प्रति चौरस फूट किंमत 59,875 रुपये आहे. यासाठी श्रद्धा कपूरने 6.24 कोटी रुपये मोजले आहेत.

श्रद्धा कपूरने आधीच भाड्याने एक अपार्टमेंट घेतले आहे

मात्र, श्रद्धा कपूरची रिअल इस्टेटमधील आवड नवीन नाही. यापूर्वी त्यांनी एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. वृत्तानुसार, 3,928.86 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले अपार्टमेंट एका वर्षासाठी लीजवर घेण्यात आले होते. यासाठी श्रद्धाने 72 लाख रुपये आगाऊ दिले होते. अभिनेत्रीच्या या फ्लॅटसोबत चार कार पार्किंग एरियाचाही समावेश करण्यात आला आहे. या घरासाठी त्यांनी 36 हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी आणि 1000 रुपये नोंदणी शुल्क भरले होते.

श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल

श्रद्धा कपूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाले तर, अभिनेत्रीसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले होते. तिचा ‘स्त्री 2’ने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. भलेही या अभिनेत्रीच्या नावावर फारसे चित्रपट नसले तरी लोकांच्या मनावर राज्य कसे करायचे हे तिला चांगलेच ठाऊक आहे. आलिशान अपार्टमेंट, कार आणि सर्वोत्तम चित्रपटांसोबतच श्रद्धाचा बॉलिवूड आणि रिअल इस्टेटमधील प्रवासही अप्रतिम आहे.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...