AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor : 6.24 कोटींच्या फ्लॅटमधून श्रद्धा कपूरची तगडी कमाई; आलिशान फ्लॅट दिला रेंटने, महिन्याचं भाडं किती ?

श्रद्धा कपूर आणि तिचे वडील आलिशान फ्लॅटमुळे चर्चेत आहेत, ज्यामुळे दर महिन्याला त्यांची मोठी कमाई होणार आहे. गेल्या वर्षी विकत घेतलेलं घर त्यांनी आता रेंटने दिलं आहे. किती आहे भाडं ?

Shraddha Kapoor : 6.24 कोटींच्या फ्लॅटमधून श्रद्धा कपूरची तगडी कमाई; आलिशान फ्लॅट दिला रेंटने, महिन्याचं भाडं किती ?
| Updated on: Oct 07, 2026 | 7:37 PM
Share

बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)आणि तिचे वडील, अभिनेता शक्ति कपूर सध्या त्यांच्या आलिशान फ्लॅटमुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहिनीनुसार, श्रद्धा आणि शक्ति कपूर यांनी महालक्ष्मी येथे विकत घेतलेला आलिशान फ्लॅट आता भाड्याने दिला आहे. CRE Matrix मधील प्रॉपर्टीशी निगडीत डॉक्युमेंट्सनुसार, महालक्ष्मी येथील त्यांचा हा फ्लॅट जवळपास 1050 स्क्वेअर फुटांचा आहे. त्यांनी हा फ्लॅट 3 वर्षांसाठी लीजवर दिला आहे. पहिल्या वर्षी त्यांना दर महिन्याला भाडं म्हणून 2.5 लाख रुपये मिळतील आणि दरवर्षी त्यामध्ये 5% टक्के वाढ होईल असं समजतं.

दरवर्षी होणार भाडेवाढ

म्हणजेच दुसऱ्या वर्षी ही रक्कम जवळपास 2.62 लाख आणि तिसऱ्या वर्षी ही रक्कम 2.75 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. सिक्युरिटी अमाऊंटबद्दल बोलायचं झालं तर या डीलसाठी 7.5 लाखांचे रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फ्लॅटचं लीव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट 26 जून 2026 रोजी झालं आणि तीन वर्षांची लीज 1 जुलै 2026 पासून सुरू झाली. ती 30 जून 2029 पर्यंत असेल.

जानेवारी 2025 मध्ये विकत घेतला होता फ्लॅट

श्रद्धा कपूर आणि तिचे वडील शक्ति कपूर यांनी विकत घेतलेलं अपार्टमेंट मुंबईच्या महालक्ष्मी ईस्टमध्ये असलेल्या पिरामल महालक्ष्मी साऊथ टॉवरमध्ये आहे. फ्लॅट पूर्णपणे फर्निश्ड असून, त्यामध्ये सोफा, खुर्च्या, कपाट, चार एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, गॅस स्टोव्ह, हब, चिमनी आणि डायनिंग टेबल यांसारख्या अनेक सोयी आहेत. श्रद्धा आणि शक्ति कपूर यांनी गेल्या वर्षी, जानेवारी 2025 मध्ये साऊथ मुंबईतील पिरामल महालक्ष्मी साऊथ टॉवरमध्ये एक नवीन आलिशान अपार्टमेंट विकत घेतलं होते. तब्बल 6.24 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलेल्या या फ्लॅटची डील 13 जानेवारी 2025 रोजी झाली होती, अशी माहिती समोर आली होती.

आता भाड्याने दिलेल्या लीज अ‍ॅग्रीमेंटबद्दल बोलायचं झालं तर या घराचा उपयोग फक्त राहण्यासाठी केला जाऊ शकतो. ज्याचं भाडं अभिनेत्री श्रद्धा कपूरला मिळणार असलं तरी या फ्लॅटचा मेंटेनन्स, टॅक्स आणि काही इतर फी श्रद्धा आणि शक्ति कपूरकडून भरलं जाईल. तर वीजेचं बिल भाडेकरूला त्यांच्या वापराप्रमाणे भरावं लागेल.

श्रद्धा स्वतः भरते 72 लाखांचं भाडं

श्रद्धा कपूर ही याआधी मुंबईच्या जुहू भागातील आपल्या महागड्या भाड्याच्या घरामुळेही चर्चेत होती. तिला सुमारे 3,929 चौ.फूट आकाराचे एक अपार्टमेंट महिन्याला 6 लाख रुपयांच्या भाड्याने मिळाले होते. नंतर 2026 मध्ये तिने त्याच घराचा लीज करार आणखी एक वर्षासाठी वाढवला. या घराचे वार्षिक भाडे जवळपास 72 लाख रुपये सांगितलं जातं.

श्रद्धा कपूरच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘आशिकी 2’, ‘एक विलन’, ‘स्त्री’, ‘हैदर’ आणि ‘रॉक ऑन 2’सारखी यशस्वी चित्रपट दिले आहेत. असं सांगितलं जातं की श्रद्धा ही तिच्या पालकांबरोबर – शक्ति कपूर आणि शिवांगी कोल्हापुरी, आणि भाऊ सिद्धांत कपूर सोबत मुंबईत जुहू बीचजवळ समुद्राच्या समोर असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहते.

Follow Us
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी