AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Trend: “टोकाची विधानं करण्यापेक्षा..”, श्रेयस तळपदेचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सल्ला

अर्जुन कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि आमिर खान यांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले त्याबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली.

Boycott Trend: टोकाची विधानं करण्यापेक्षा.., श्रेयस तळपदेचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सल्ला
श्रेयस तळपदेचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सल्ला Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 4:12 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडसाठी अत्यंत कठीण काळ सुरू आहे. एकीकडे सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड (Boycott Trend) सुरू असताना दुसरीकडे मोठमोठ्या कलाकारांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटत आहेत. बॉयकॉट ट्रेंडवर काही कलाकार मोकळेपणे व्यक्त झाले. आता अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे त्याने अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रतिक्रियांवरही टीका केली आहे. तुम्हाला चित्रपट आवडत नसेल तर तो पाहू नका, असंच थेट आलिया (Alia Bhatt) म्हणाली होती. मात्र “चित्रपट म्हणजे प्रेम आहे आणि हे काम म्हणजे जणू तुमची गर्लफ्रेंड आहे. तुमची गर्लफ्रेंड जर रागावली असेल, नाराज असेल तर तिला सोडून देऊ नका, तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा,” असं श्रेयस म्हणाला.

‘इक्बाल’ ते ‘कौन प्रवीण तांबे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या श्रेयसने ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बॉयकॉट ट्रेंडबद्दल आपलं मत मांडलं. अर्जुन कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि आमिर खान यांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले त्याबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली.

कलाकारांच्या काही विधानांवर टीका करताना श्रेयस म्हणाला, “सध्या इंडस्ट्रीत जी वक्तव्ये केली जात आहेत ती मला आवडत नाहीत. इंडस्ट्रीशी निगडित काही लोक यावेळी जे वक्तव्य करत आहेत त्यावर मी खूश नाही. आम्ही सर्व इंडस्ट्रीत काम करतो. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल बाप्पाचे आभार मानले पाहिजेत. अशा स्थितीत जी प्रकारची विधाने येत आहेत, ती मला आवडत नाहीत.”

आपला मुद्दा मांडताना तो पुढे म्हणाला, “तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल, तुमची गर्लफ्रेंड असेल आणि ती तुमच्यावर नाराज असेल, रागावली असेल, तर तुम्ही तिला थेट सोडून देत नाही. तुम्ही तिला थांबवता, तिचं मन राखण्याचा प्रयत्न करता. मला वाटतं प्रेक्षक आमच्यासाठी त्या प्रेयसीसारखेच आहेत. ते आमच्यावर रागावले असतील तर त्यांचं मन राखणं हे आमचं कर्तव्य आहे. आपण त्यांना त्यामागचं कारण विचारलं पाहिजे. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा.”

“चित्रपटसृष्टीतील काही लोक काहीही म्हटले तरी, मी प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही आमचं काम पहा. तुम्ही आमचे चित्रपट पहा. OTT वर आमची मालिका पहा. जर प्रेक्षकांनीच आमचं काम पाहिलं नाही तर आम्हा कलाकारांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही,” अशी विनंतीदेखील त्याने केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.