श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल दिलासादायक बातमी; कधी मिळेल डिस्चार्ज?

अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल चाहते काळजी व्यक्त करत आहेत. मात्र त्याच्या डिस्चार्जविषयी दिलासादायक बातमी समोर येत आहे. दिग्दर्शक सोहम शाह यांनी श्रेयसची रुग्णालयात भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ते काय म्हणाले, जाणून घेऊयात..

श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल दिलासादायक बातमी; कधी मिळेल डिस्चार्ज?
Shreyas Talpade
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 8:13 AM

मुंबई : 18 डिसेंबर 2023 | गुरुवारी 14 डिसेंबर रोजी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी रात्रीच त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. श्रेयसच्या प्रकृतीबद्दल चाहते सतत काळजी व्यक्त करत असतानाच दिलासादायक बातमी समोर येत आहे. त्याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक सोहम शाह यांनी याविषयीची माहिती दिली आहे. ‘लक’ आणि ‘काल’ या चित्रपटांचे दिग्दर्शक सोहम शाह यांनी नुकतीच श्रेयसची रुग्णालयात भेट घेतली.

‘ई टाइम्स’शी बोलताना सोहम म्हणाले, “श्रेयसला ज्यादिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्याचदिवशी मी त्याची भेट घेतली होती आणि आजसुद्धा मी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करून आलो. श्रेयसला माझ्यासोबत हसताना आणि बोलताना पाहून मला खूप बरं वाटलं. त्याच्यावर वेळेत उपचार करण्यात आल्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली. श्रेयसची पत्नी दिप्तीने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, ते खूप बरं झालं. ट्रॅफिकमधून हॉस्पिटलला पोहोचणं त्यावेळी खूप आव्हानात्मक होतं. पण देवाच्या कृपेने सर्वकाही ठीक झालं आणि तो हळूहळू बरा होत आहे. त्याला सोमवारी सकाळी डिस्चार्ज मिळू शकतो.”

श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदेनंही शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. ‘माझ्या पतीने नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्या सर्वांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता त्याची प्रकृती स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल.’ अशी पोस्ट तिने लिहिली होती.

हे सुद्धा वाचा

श्रेयस गुरुवारी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. शूटिंगनंतर घरी परतल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्याला तातडीने अंधेरीतल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान होताच डॉक्टरांनी गुरुवारी रात्री श्रेयसवर अँजियोप्लास्टी केली.

‘वेलकम टू द जंगल’ हा ‘वेलकम’ या फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शक अहमद खान करतोय. या चित्रपटात श्रेयससोबतच अक्षय कुमार, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, झाकीर हुसैन आणि यशपाल शर्मा यांच्या भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.