हार्ट अटॅक येण्याच्या काही वेळापूर्वी काय करत होता श्रेयस तळपदे? व्हिडीओ आला समोर

शुकवारी अभिनेता अक्षय कुमारने श्रेयसची रुग्णालयात भेट घेतली. दहा मिनिटं तो बेलेव्यू रुग्णालयात होता आणि यावेळी त्याने श्रेयसच्या प्रकृतीची विचारपूस केली. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटासाठी श्रेयस आणि अक्षय सोबत शूटिंग करत होते. या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ अक्षयने पोस्ट केला होता.

हार्ट अटॅक येण्याच्या काही वेळापूर्वी काय करत होता श्रेयस तळपदे? व्हिडीओ आला समोर
Shreyas TalpadeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 10:43 AM

मुंबई : 16 डिसेंबर 2023 | मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर घरी परतल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याला उपचारासाठी तातडीने अंधेरी इथल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल केलं असता रात्री 10 च्या सुमारास श्रेयसवर अँजियोप्लास्टी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असून काही दिवसांत डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती पत्नी  दिप्ती तळपदेनं सोशल मीडियाद्वारे दिली. आता हार्ट अटॅक येण्यापूर्वीचा श्रेयसचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये श्रेयस त्याच्या आणि इतर कलाकारांसोबत मिळून चित्रपटाची शूटिंग करताना दिसतोय.

अक्षय कुमारसोबत इतरही कलाकार ‘वेलकम 3’ या चित्रपटाची शूटिंग करत होते. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार, अर्षद वारसी, कृष्णा अभिषेक, श्रेयस तळपदे हे एक कॉमेडी सीन शूट करताना दिसत आहेत. एकीकडे अक्षय, अर्षद आणि कृष्णासोबत इतर कलाकार एका उंचावर सीन शूट करत आहेत, तर दुसरीकडे काही कलाकारांसोबत श्रेयस शिडीने वर चढताना दिसतोय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

शुक्रवारी अक्षय कुमारने रुग्णालयात जाऊन श्रेयसची भेट घेतली. त्यानंतर श्रेयसची पत्नी दिप्तीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. ‘माझ्या पतीने नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्या सर्वांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता त्याची प्रकृती स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आम्ही काही गोष्टी खासगी ठेवू इच्छितो, त्याचा तुम्ही आदर करावा अशी मी विनंती करते. तुमचा भक्कम पाठिंबा हा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे,’ अशा शब्दांत दिप्तीने भावना व्यक्त केल्या होत्या.

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग संपवून घरी परतलेल्या श्रेयसला श्वास घेण्यास त्राण जाणवू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ‘वेलकम टू द जंगल’ हा ‘वेलकम’ या फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शक अहमद खान करतोय. या चित्रपटात श्रेयससोबतच अक्षय कुमार, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, झाकीर हुसैन आणि यशपाल शर्मा यांच्या भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...