AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shruti Haasan सोबत घडली गंभीर घटना ; ‘तो’ फोटो शेअर करत दिली मोठी अपडेट

Shruti Haasan हिने घडलेल्या 'त्या' गंभीर घटनेबाबत दिली मोठी अपडेट... फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते देखील म्हणाले...

Shruti Haasan सोबत घडली गंभीर घटना ; 'तो' फोटो शेअर करत दिली मोठी अपडेट
Shruti HaasanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2023 | 10:20 AM
Share

Shruti Haasan : टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रृती हासन (Shruti Haasan) कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्यामाध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री श्रृती तिच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील अभिनेत्रीने एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. ज्यामुळे चाहेत चिंतेत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगत आहे. (shruti haasan songs)

शुटिंगच्या सेटवर अभिनेत्रीसोबत एक घटना घडली आहे. ज्यामुळे अभिनेत्री जखमी झाली आहे. खुद्द अभिनेत्रीने या गोष्टीचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या गुडघ्यांना दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्रीच्या दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘कामाच्या ठिकाणी आणखी एक उत्तम दिवस…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या कॅप्शनवरून अंदाज वर्तवण्यात येत आहे की, ती शुटिंग दरम्यान जखमी झाली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोची आणि प्रकृतीची चर्चा रंगत आहे. (shruti haasan speech)

अभिनेते कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन नेहमीच चर्चेत असते. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये श्रुतीने जबरदस्त भूमिका केल्या आहेत. श्रुती तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मात्र, नुकताच श्रुतीने तिचे असे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यामुळे ती चर्चेत आलीये.

श्रृतीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री अभिनेता प्रभास याच्यासोबत झळकणार आहे. श्रृती हासन आणि प्रभास ‘सालार’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सध्या चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी केजीएफ स्टारर दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या खांद्यावर आहे. सिनेमा येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. (shruti haasan dance)

सध्या सर्वत्र श्रतीच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, श्रृती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्रृती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.