मुंबई: अभिनेते कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन ही मानसिक स्वास्थ्याबद्दल माध्यमांमध्ये मोकळेपणे बोलताना दिसले. मात्र मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळेच तिने नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली नाही, अशी चर्चा सुरू झाली. या चर्चांवर आता श्रुतीने उत्तर दिलं आहे. ‘वॉल्टेअर वीरैय्या’ या दाक्षिणात्य चित्रपटात श्रुती भूमिका साकारतेय. या चित्रपटाच्या प्री-रिलीजचा कार्यक्रम नुकताच पार पडला. मात्र या कार्यक्रमाला श्रुती गैरहजर होती. वॉल्टेअर वीरैय्या या तेलुगू चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी यांची मुख्य भूमिका आहे. तर अभिनेता रवी तेजा यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.