‘तो’ गाण्याचा वाद गायकाच्या अंगलट, गाण्यातून महिलांवर खालच्या पातळीवर टीका, महिला आयोगानेही..
नुकताच एका गाण्यामुळे मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर या गायकाच्या विरोधात लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. लोक या गायकावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. हेच नाही तर आता हे सर्व प्रकरण थेट महिला आयोगाकडे पोहचले आहे. महिला आयोगाने या गायकाला नोटीसही पाठवली आहे.

नुकताच एक गायक मोठ्या अडचणीमध्ये अडकलाय. हेच नाही तर आता या गायकाच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे देखील बघायला मिळतंय. एका गाण्यामुळे हा गायक अडचणीत आलाय. या गायकावर गंभीर आरोप करण्यात आलेत. या गायकाच्या नव्या गाण्यातून महिलांबद्दल चुकीचे आणि वाईट शब्द वापरले गेल्याचा आरोप हा करण्यात आलाय. आता हे प्रकरण थेट महिला आयोगापर्यंत जाऊन पोहचले आहे. या गायकावर जोरदार टीका ही केली जातंय. आता हे निश्चितच आहे की, गायकाच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये.
आता या प्रकरणात महिला आयोगाने पोलिसांकडून या प्रकरणातील अहवाल मागितला आहे. हेच नाही तर पंजाब महिला आयोगाने गायक जैजी बी याला नोटीसही पाठवली असून पुढच्या आठवड्यापर्यंत नोटीसला उत्तर जैजीला द्यावी लागणार आहे. जैजी याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणे गायली आहेत.
जैजी याने जिने मेरा दिल लुटेया, नाग, जवानी, केसरी ही हिट गाणे गायली आहेत. महिला आयोगाने मोठा इशारा जैजी याला दिलाय. जैजी याचे मड़क शकीनां दी हे गाणे लाॅन्च झाले आणि हेच गाणे वादात सापडले. या गाण्यामध्ये महिलांची तुलना ही थेट भेडसोबत केल्याचा गंभीर आरोप हा करण्यात आलाय.
जैजीने महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर दिले नाही तर त्याच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा हा महिला आयोगाकडून देण्यात आलाय. आता या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. जैजी याच्यावर जोरदार टीका केली जातंय. हेच नाही तर पंजाबमध्ये जैजी याचा पुतळा देखील जाळण्यात आलाय.
जैजीचे खरे नाव जसविंदर सिंह आहे. जैजी हा सध्या भारतामध्ये नसून गेल्या काही वर्षांपासून तो कॅनडामध्येच राहतो. जैजीला महिला आयोगाकडून मेल देखील सेंड करण्यात आल्याचे कळतंय. आता या गाण्याच्या वादावर जैजी काय उत्तर देतो याकडे सर्वांच्या नजरा असल्याचे बघायला मिळंतय. मात्र, जैजीच्या अडचणीत वाढ झाल्याचे स्पष्ट आहे.
