Maharshtra News LIVE : मनसे नेते अमित ठाकरे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर
Maharashtra news : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच सचिन खरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जातंय.

LIVE NEWS & UPDATES
-
वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांची सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका
साखर दरवाढ आणि इथेनॉलबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दोन्ही सेना बोलत नाहीत. कारण त्यांचे लोकं यांच्याशी संबंधित आहेत म्हणून ते बोलणार नाहीत. आज ईदनिमित्त सोलापूरच्या युवकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने आज सोलापूरला भेट दिली आहे. प्रत्येक नेत्याने, कार्यकर्त्याने, मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी मनमोकळेपणाने पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत.
-
मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
एमपीएसस ने तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सक्त कारवाईचे आदेश दिलेले आहेत. पुन्हा या प्रकारची पेपर फुटी होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेऊ, असे मंत्री योगेश कदम म्हणाले.
-
-
बांद्रा लिंकिंग रोड येथे परप्रांतीय फेरीवाल्या कपडे विक्रेत्यांची दादागिरी
गाड्यांची ये जा सुरू असणाऱ्या रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकल्याने मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांनी गाडी थांबवून जाब विचारला. “तुम्हारे घर पे थुका क्या” असे म्हणत या परप्रांतीय फेरीवाल्यांची उलट उत्तर दिले. उलट उत्तर देणाऱ्याला मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असता तेथील फेरीवाल्यांनी मुजोर परप्रांतीय कपडे विक्रेत्याला तेथून पळवून लावले
-
देशातील उच्च-घनतेचे रेल्वे जाळे चार मार्गांपर्यंत विस्तारण्याची योजना
देशातील उच्च-घनतेचे रेल्वे जाळे चार मार्गांपर्यंत विस्तारण्याची योजना असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकारने देशातील ७ महत्त्वाच्या उच्च-घनतेच्या रेल्वे मार्गांवर लक्ष केंद्रित केले आहे या ७ मार्गांची एकूण लांबी अंदाजे ११,००० किलोमीटर आहे. देशाच्या रेल्वे जाळ्यामध्ये केवळ १६ टक्के वाटा असूनही, एकूण रेल्वे वाहतुकीपैकी ४१ टक्के वाहतूक या मार्गांवरून होते, ज्यामुळे नागरिक प्रभावित झाले आहेत. विद्यमान उच्च-घनतेच्या मार्गांचा चार रेल्वे मार्गांमध्ये विस्तार करून कार्यक्षमता वाढवणे असे आहे.
-
शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांचा ३० ऑगस्टला जिल्हा दौरा होत आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार जळगावात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार थेट संवाद साधला. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाला शरद पवारांची उपस्थित असतील. जळगाव दौऱ्यात शरद पवार हे ३० रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत
-
-
लक्ष्मण हाके यांची टीका
जंतर-मंतरच्या आंदोलन पोर उभ करू शकत असतील तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधलं ओबीसीच आंदोलन भूतो ना भविष्य होणार आहे दिल्लीला जंतर-मंतर वरती विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केले ,सोनम वांचूक नावाचा आयटी इंजिनिअर होता 15 दिवस तिथे एकही पुढारी, पक्ष , मेन स्टीम मीडिया गेली नाही ,मनोज जरांगे यांचे आंदोलन लांब आहे आणि आणि तिथे मंडळातील मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड ,विखे पाटील,शंभू राजे देसाई गाढव मेल ओझ्यान शंभू मेल येरझाऱ्यान,अस म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांना भेटायला आलेल्या सरकार च्या शिष्टमंडळावर हिंगोलीच्या ओबीसी बैठकीतून टीका केली आहे ..
-
काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर अज्ञातांकडून फायरिंग
नागपूरमध्ये रात्री काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर काही अज्ञातांनी फायरिंग केली होती. त्यांच्या घरी काँग्रेस आमदार विकास ठाकरे, नितीन राऊत, भाजप आमदार कृष्णा खोपडे, नगरसेवक बंटी कुकडे, नगरसेविका सीमा ढोमणे, शारदा बारई सह अनेक लोकप्रतिनिधी भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त सुद्धा उपस्थित होते
-
-
कुंभमेळ्याच्या खर्चावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल
कुंभमेळ्याच्या खर्चावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सवाल केला. कुंभमेळ्यावर 30 हजार कोटी खर्च होतात; त्यातून किती शाळा किंवा IIT उभारता आल्या असत्या? नांदेडमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी हायकोर्टात गेलो असून, निकालाचा परिणाम सोलापूर आणि धुळ्यावरही होईल. सोलापुरात AIMIM चे 8 नगरसेवक आहेत. वर्षभरात त्यांना जम बसवून विकासाच्या मुद्द्यांवर काम करावे लागेल. नांदेडमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी हायकोर्टात गेलो असून, निकालाचा परिणाम सोलापूर आणि धुळ्यावरही होईल, असे जलील म्हणाले.
-
मनसेचे नेते अमित ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर
मनसेचे नेते अमित ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नीट परिक्षेमुळे आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदी यांच्या परिवाराची ते भेट घेणार आहेत. – रामनगर येथील आकांक्षा चतुर्वेदी यांच्या घराच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उद्या सभासद नोंदणी आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर उद्या दुपारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल.
-
फुगेवाडी दारूकांत प्रकरणातील फरार आरोपीला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
पुणे – फुगेवाडी दारूकांत प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यत आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडलं. -दत्ता लोंढे असं फरार आरोपीचे नाव असून गाडीची नंबर प्लेट बदलून, वेष बदलून तो वावरत होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी या आरोपीला राजेवाडीतून ताब्यात घेतलं. गेल्या 4 महिन्यांपासून तो फरार होता, अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
लोंढे यांने संपूर्ण अवैध दारू निर्मिती आणि वितरणाचा सिंडिकेट चालवला होता अशी माहिती समोर आली आहे.
-
बांद्रा लिंकिंग रोड येथे परप्रांतीय फेरीवाल्या कपडे विक्रेत्यांची दादागिरी
बांद्रा लिंकिंग रोड येथे परप्रांतीय फेरीवाल्या कपडे विक्रेत्यांनी केली दादागिरी. गाड्यांची ये जा सुरू असणाऱ्या रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकल्याने मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांनी गाडी थांबवून जाब विचारला. तेव्हा, “तुम्हारे घर पे थुका क्या” असं म्हणत या परप्रांतीय फेरीवाल्यांनी उलट उत्तर दिलं. मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असता तेथील फेरीवाल्यांनी त्या मुजोर परप्रांतीय कपडे विक्रेत्याला तिथून पळवून लावलं.
-
धाराशिव – कळंबमध्ये ग्रामसभेनंतर तंटामुक्ती अध्यक्षावर जीवघेणा हल्ला
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील पश्चिम लोहाटा येथे ग्रामसभा आटोपल्यानंतर तंटामुक्ती अध्यक्षावर जमावाकडून तुफान हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ग्रामसभेनंतर झालेल्या वादातून तंटामुक्ती अध्यक्षावर जमावाने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं. दरम्यान, हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष अध्यक्ष विनोद सावंत यांनी प्रशासनाकडे केली आहे.
-
जळगाव – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा 30 ऑगस्टला जिल्हा दौरा
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांचा 30 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याचा दौरा. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून बैठक घेण्यात आली. शरद पवार हे जळगावात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार . मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाला शरद पवारांची उपस्थिती असेल.
-
नाशिक – सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये भक्ती संगम कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक – सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये भक्ती संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भक्ती संगम कार्यक्रमाचे उद्घाटन होणार . राहुल देशपांडे, मैथली ठाकूर , चारुदत्त आफळे इंदोरीकर महाराज यांच्यासह विद्य मान्यवरांचे संगीत आणि कीर्तनाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
-
नाशिक : लासलगाव येथून दिल्लीसाठी कांदा एक्सप्रेस रवाना
नाशिकच्या लासलगाव येथून दिल्लीसाठी कांदा एक्सप्रेस रवाना झाली आहे. 42 तासांच्या प्रतीक्षेनंतर कांदा एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने निघाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर आणि सहकाऱ्यांनी कांदा एक्सप्रेसला तीव्र विरोध केला होता. रेल्वे सुरक्षा बल आणि लासलगाव पोलिसांच्या मदतीने गणेश निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रेल्वे ट्रॅकवरून केल्यानंतर ही एक्सप्रेस रवाना करण्यात आली. या एक्सप्रेसमध्ये 500 टन कांदा असल्याची माहिती समोर आली आहे.
-
परभणी – सोयाबीन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक
परभणीच्या ताडकळस मध्ये कैवल्य ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली सोयाबीन खरेदी करणाऱ्या चार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अमानत म्हणून घेतलेला सोयाबीनचा माल परस्पर विक्री करून शेतकऱ्यांना 50 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात चार व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून फरार झालेल्या आरोपिंचा शोध सुरू करण्यात आला आहे.
-
बुलढाणा : एमआयडीसीतील केवळ 50 टक्के भूखंडावरच उद्योग सुरू
बुलढाणा जिल्ह्यातील उद्योगांसाठी शेकडो हेक्टर जमीन संपादित झाली, पायाभूत सुविधांवर सार्वजनिक निधी खर्च झाला आणि उद्योजकांना सवलतींचे पाठबळही मिळाले. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिकीकरणाचे वास्तव कागदावरील भूखंडवाटपाच्या पुढे सरकलेले नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील आठ औद्योगिक क्षेत्रांतील वाटप झालेल्या 1156 भूखंडांपैकी केवळ 589 भूखंडांवर उत्पादन सुरू आहे. वाटप झालेले भूखंडांच्या तुलनेत प्रत्यक्ष उत्पादनाचे प्रमाण अवघे 50.95 टक्के आहे.
-
कल्याण पूर्वेत टवाळखोरांचा हैदोस, दोन दुचाकींना लावली आग
कल्याण पूर्वेत मध्यरात्री टवाळखोरांचा हैदोस पहायला मिळाला. वाहनांची तोडफोड करत दोन दुचाकींना आग लावली. अचानक लागलेल्या आगीने खडेगोळवली परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत रस्त्याच्या कडेला उभ्या 10 ते 12 वाहनांचे नुकसान झाले असून घराच्या छतालाही आगीची झळ बसली असल्याचे समोर आले आहे.
-
GIVA ने क्रिती सेनॉनची राखीची जाहिरात मागे घेतली
ज्वेलरी ब्रँड GIVA ने बॉलिवूड अभिनेत्री कृती सॅनॉनची राखीची जाहिरात मागे घेतली आहे. ट्रोलिंगनंतर, कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “आम्ही भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचा पूर्ण आदर करतो. एक ब्रँड म्हणून, आम्ही असे आनंदाचे प्रसंग नेहमी आमच्या संपूर्ण कुटुंबासोबत साजरे करतो आणि या प्रसंगी आम्हाला आमच्या पाळीव प्राण्यांबद्दलचे प्रेम आणि आनंदही व्यक्त करायचा होता. जर आमच्या जाहिरातीमुळे समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या असतील, तर तसा आमचा हेतू नाही. हा आदर लक्षात घेऊन, आम्ही आमची जाहिरात सर्व माध्यमांमधून मागे घेत आहोत.”
-
नेपाळमधील मुसळधार पाऊस आणि भूस्खलनानंतर बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा
बिहार: नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंडक नदीची पाणी पातळी वाढल्याने पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन उच्च सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
-
मराठी सक्तीचे करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले
ऑटो-टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
-
नेपाळमधील फ्लॅश फ्लडनंतर एसएसबीच्या 11 तुकड्या तैनात
नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत अचानक महापूर आला असून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. भारत-नेपाळ सीमेची सुरक्षा करणाऱ्या सशस्त्र सीमा बल च्या 11 तुकड्यांना तातडीने मदत आणि बचावकार्यासाठी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
-
औषध निरिक्षक पेपरफुटीप्रकरणात मोठी कारवाई
औषध निरिक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीच्या अव्वर सचिवालाही अटक करण्यात आली आहे. एमपीएसचे अव्वर सचिव अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला. पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटीलची भुमिकाही संशयास्पद आहे.
-
अमरावतीतील परिस्थितीचा आढावा घेत आहे, दोषींवर कारवाई होणार- बावनकुळे
अमरावतीतील दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे. नियोजित दौऱ्यामुळे राज्याच्या बाहेर असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं.
-
अमरावतीत चिमुकले होरपळले पालकमंत्री पाणीपुरी खात आहेत- अंधारे
बावनकुळेंचा व्हिडिओ दाखवून सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे. अमरावतीत चिमुकले होरपळले असताना पालकमंत्री पाणीपुरी खात आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. आमदार नितीन देशमुख यांनीही बावनकुळेंवर जोरदार टीका केली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या युवा खेळाडूंशी संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 27 ऑगस्ट 2026 रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिना’च्या पूर्वसंध्येला देशभरातील युवा खेळाडू आणि विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधणार आहेत. ‘मेरा युवा भारत’ आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘खेलो इंडिया संवाद – खेल की बात, प्रधानमंत्री मोदी के साथ’ या देशव्यापी मोहिमेतंर्गत हा संवाद होणार आहे
-
अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला मारहाण
जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या गोंदी येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. आज सकाळी अंबड चे तहसीलदार सोमेश मोहिते हे अवैध वाळू उपसा होत असल्याच्या माहितीवरून महसूल पथकासह कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र,कारवाई सुरू असतानाच काही वाळू वाहतूकदारांनी महसूल पथकाशी हुज्जत घालत तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेत तहसीलदार सोमेश मोहिते आणि एक कोतवाल यांना जबर मारहाण करण्यात आली, दरम्यान,या गोंधळाचा फायदा घेत ताब्यात घेतलेल्या काही हायवा तहसीलदारांच्या गाडी ला धडक देत वाळू माफियांनी घटनास्थळावरून पळवून नेल्या, या घटनेमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आला असून,या प्रकरणी गोंदी पोलिसांकडून पंचनामा केला जात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
-
नवी मुंबईतील उलवे मध्ये राहणाऱ्या बांधकाम ठेकेदार गजानन देवकाते यांनी केली आत्महत्या
नवी मुंबईतील उलवे मध्ये राहणाऱ्या बांधकाम ठेकेदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केलीय.राहत्या घरात पंख्याला लटकून केली आत्महत्या, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्यांना पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे केले घोषित. मागील अनेक वर्ष देवकाते शासनाचे बांधकामांचे ठेके घेत होते. मात्र मागील काही महिन्याचे बिल थकल्याची माहिती समोर येते. या कारणाने आत्महत्या केल्याचे बोलले जातं आहें.
-
बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा..
जळगावच्या चोपडा तालुक्यातील बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत पथकाने १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट दारू तयार करणाऱ्या आरोपींचा तपास सुरू आहे. कारखान्यामध्ये स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
-
जालना जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसापासून पावसाच मोठा खंड
पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही, अशातच मागच्या वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांची कपाशी सोयाबीन मका यासह इतर पिके धोक्यात आली असून सुकली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातल्या लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी देखील चिंताजनक असल्याची आकडेवारी समोर आली. बदनापूर तालुक्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पात केवळ एकोणावीस टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आसपासच्या गावांवर आणि सिंचनाचं संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली, हजारो हेक्टर शेतीचा सिंचन या प्रकल्पावर अवलंबून आहे मात्र पावसाने दिलेली ओढ आणि प्रकल्पात राहिलेला पाणीसाठा पाहता येत्या काळात ही परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावर झिरवळांचा चिमटा; “आमच्या खात्यात कधी कोण नंबर लावून बसेल, भरोसा नाही”
पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी गेल्या १४ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी भाष्य करताना आंदोलक आपल्याविरोधात घोषणा देत असले तरी ते आपलेच आहेत, असं म्हटलं. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाचा संदर्भ देत “आमच्या खात्यात कधी कोण नंबर लावून बसेल, काही भरोसा नाही” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
-
विरोधीपक्षाच्या खासदारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
विरोधीपक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार अरविंद सावंत म्हणाले, “पेपरफुटी, कायदा सुव्यवस्थांसह विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत चर्चा झाली. गेल्या दोन वर्षांपासून दिशा कमिटी स्थापन झालेली नाही.”
-
डोंबिवली सोनारपाडा जमीन वादाला हिंसक वळण; विकासक आणि साथीदारांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
डोंबिवली सोनारपाडा जमीन वादप्रकरणी विकासक आणि साथीदारांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. डोंबिवलीच्या सोनारपाडा-मानगाव परिसरात जमीन वादातून राडा झाला होता. बाऊन्सरसह आलेल्या विकासकाकडून जेसीबीने चाळी पाडण्याचा प्रयत्न झाला होता. पाडकाम रोखण्यासाठी गेलेल्या रहिवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विकासक रामेश्वर गुप्ता, अवधेश गुप्ता आणि त्यांच्या दहा ते बारा साथीदारांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावल्याप्रकरणी भाजपकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावल्याप्रकरणी भाजपकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणीने अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेत केली फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मालेगावचे उपमहापौर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी वारंवार अशी काम करत असतात, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार 29 महापुरुषांचे फोटो लावता येतात. पुन्हा असे केलेस तर मोठ्या संख्येने महापालिकेच्या कार्यालयात जाऊन त्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
-
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेतील घटनाक्रम थक्क करणारा
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेतील घटनाक्रम थक्क करणारा आहे. या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत.
-
एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात मोठी वाढ; शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा सडल्याने आवक घटली
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी एपीएमसी बाजारात २० ते २५ रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा आता ३५ ते ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर वाशीच्या किरकोळ बाजारातही कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, आठवडाभरापूर्वी ४० ते ४५ रुपये किलो असलेला कांदा आता ७० ते ८० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
-
कोणतेही भूखंड मोफत देण्यात आलेले नाहीत; अमरिश पटेल यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर
भूखंड हस्तांतरणाबाबत गैरसमज झाला आहे. कोणतेही भूखंड मोफत देण्यात आलेले नाहीत, असं उत्तर अमरिश पटेल यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर दिलं आहे.
-
उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार
उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार दिसत आहे. रसुवा जिल्ह्यातील तिमुरे, स्याब्रुबेसीत पुराचा तडाखा पाहायला मिळाला. 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
-
नवी मुंबईतील बांधकाम ठेकेदार गजानन देवकाते यांची आत्महत्या
नवी मुंबईतील उलवे मध्ये राहणाऱ्या बांधकाम ठेकेदार गजानन देवकाते यांची आत्महत्या. आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ. राहत्या घरात पंख्याला लटकून केली आत्महत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्यांना पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे केले घोषित. मागील अनेक वर्ष देवकाते शासनाचे बांधकामांचे ठेके घेत होते. मात्र मागील काही महिन्याचे बिल थकल्याची माहिती समोर येते. उलवे पोलिसांनी याबाबतचा ADR दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे
-
ईद-ए-मिलादच्या रॅलीत आदिवासी विद्यार्थ्यांकडून अल्पोपहाराचे वाटप…
अल्लाहचे नबी हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती संपूर्ण जगभरात ईद-ए-मिलाद म्हणून उत्साहात साजरी केली जाते…. गोंदिया जिल्ह्यातही ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे…. दरम्यान, आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रकल्प कार्यालय समोर आंदोलनाला बसले असताना, याच ठिकाणाहून मुस्लिम बांधवांची ईद-ए-मिलादनिमित्त रॅली जात होती… यावेळी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रॅलीतील मुस्लिम बांधवांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत अल्पोपहाराचे वाटप केले…. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या आपुलकीच्या आणि बंधुभावाच्या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे…. आंदोलनाच्या ठिकाणीही सामाजिक सलोखा, एकोपा आणि मानवतेचा सुंदर संदेश पाहायला मिळाला…..
-
हा लढा माझा एकट्याचा लढा नाही-रोहित पवार
“अधिकारी घडतात ती परिक्षा पारदर्शक व्हायला हवी, हा लढा माझा एकट्याचा लढा नाही.” असे रोहित पवार म्हणाले.
-
परिक्षा या पारदर्शक पद्धतीनेच व्हायला पाहिजेत- रोहित पवार
विद्यार्थ्यांचा लढा लढताना मला तुमच्यात अधिकारी दिसता, पुढे आपल्या काम करायचंय, त्यासाठी चांगले अधिकारी हवेत, परिक्षा या पारदर्शक पद्धतीनेच व्हायला पाहिजेत.” असे रोहित पवार म्हणाले आहे.
-
राजकारण फार वंगाळ यात शिरू नका- रोहित पवार
राजकारण फार वंगाळ यात शिरू नका, राजकारणात आम्ही काही आमदार बनण्यासाठी आलो नाही, आम्हाला खूप काही करायचे आहे, तर तेव्हा आम्हाला चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे यामुळे आमचा पाठिंबा आहे.
-
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाला शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा पाठिंबा
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे आतापर्यंत सात कंत्राटदारांनी आपला जीव गमावला आहे.. महाराष्ट्र शासनाने देयक वेळेवर दिली नाहीत तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी दिला आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत मात्र ज्या कंत्राटदाराकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनीच निविदा भराव्या आणि काम घ्यावी अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असे देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्रालदार महासंघाने आवाहन केले आहे . नवी मुंबईतील गजानन देवकते या कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू तसेच कंत्राटदार महासंघ च्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असे देखील मनोज प्रधान यांनी सांगितले
-
रोहीत पवार यांना राष्ट्रवादीत भविष्य दिसत नसेल- प्रसाद लाड
प्रसाद लाड म्हणाले की,” जरांगे पाटील यांच्या भेटीला ऊद्या मी आणि ऊदय सामंत जाणार , ऊद्या संभाजी नगरला बैठक… या बैठकीनंतर जरांगेंची भेट घेणार , पुन्हा त्यांची समजूत काढणार यापूर्वीच्या बैठकीत मराठा तरूणांसाठी आणि कुणबी दाखल्यांसाठी सरकारची काय भूमिका हे समजावून सांगितलं आहे… सरकार मराठा समाजाच्या हितासाठी कटिबद्ध… जरांगेंची समजूत काढू त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन… रोहीत पवार हे काँग्रेसच्या वाटेवर, राष्ट्रवादीत त्यांना कदाचीत भविष्य दिसत नसेल , काँग्रेसलाही त्यांच्या रुपात एक नवा संजय राऊत मिळेल… विजय वडेट्टीवार हे बेगानी शादी में अब्दूल्ला आहेत… लक्ष्मण हाके यांनाही समजावण्यासाठी आमची एक टीम काम करत आहे, त्यांचेही प्रश्न मार्गी लावू. विरोधक खासदार जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करतो…
-
प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती (राखी) सायबर फसवणुकीची शिकार
प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती (राखी) ही सायबर फसवणुकीची शिकार झाली आहे. शूटिंगवरून घरी परतल्यानंतर रक्षाबंधनासाठी शॉपिंग करताना पेमेंटच्या वेळी तिच्या बँक खात्यात पैसे नसल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिला धक्काच बसला. त्यानंतर ती थेट बँकेत गेली आणि नंतर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्यासोबत घडलेला सायबर फसवणुकीचा अनुभव राखीने सोशल मीडियावर शेअर करत पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी सांगितले की पैसे मिळूही शकतात आणि नाहीही मिळू शकत अशी प्रतिक्रिया ज्योतीने दिली आहे.
-
अमरावती मधील हे सगळे व्हेंटिलेटर बदला- वड्डेटीवार
वड्डेटीवार अमरावातीमधील प्रकरणावर म्हणाले की, “अमरावती मधील हे सगळे व्हेंटिलेटर बदला. जर हे बदलले नाही तर तुम्ही निर्लज्ज आहा. ज्या कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी लहान बाळांचे जीव वाचवले त्यांना सुद्धा 5-5 लाखाची मदत केली पाहिजे. त्या कंत्राटदारांना केवळ 8 हजार रुपये पगार मिळतो.. कंपनी 22 हजार घेते सरकार कडून आणि यांना केवळ 8 हजार देतात. गुजरातच्या ठेकेदाराला नाशिक कुंभ मेळ्याचा काम दिलं आणि त्याने दुसऱ्याला काम देऊन तो निघून गेला..”
-
दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी
दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रम या ठिकाणी आनंद दिघे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार.
-
लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण
दिल्लीला ८४० टन बफर स्टॉकचा कांदा पाठविण्याच्या निर्णयापूर्वीच लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण. सोमवारच्या तुलनेत आज सरासरी दर ३५० रुपयांनी घसरले दर. आज ३९० वाहनांतून आलेल्या कांद्याचा लिलाव. कमाल ४,२६८ रुपये, किमान १,००० रुपये तर सरासरी ३,८०० रुपये प्रतिक्विंटल दर. दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ.
-
गहाण ठेवलेलं सोनं विकल्यानं ज्वेलर्स व्यापाऱ्याचं अपहरण
गहाण ठेवलेलं सोनं विकल्यानं ज्वेलर्स व्यापाऱ्याचं अपहरण
पिस्टलचा धाक दाखवत लुटले ७९ ग्रॅम सोन्याचे दागिने
पोलीस तक्रार करू नये म्हणून दुकानाचीही तोडफोड
बदलापूर पश्चिमेच्या वालीवली नाक्यावर भीमसिंग खरवट यांच्या भैरव ज्वेलर्समधील घटना
-
जालना जिल्ह्यात 20 ते 25 दिवसापासून पावसामध्ये खंड
जालना जिल्ह्यासह मराठवाड्याच्या अनेक भागात मागच्या वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतामधील पिंक धोक्यात आली आहेत. कापूस, सोयाबीन यासह इतर पिकं सुकून चालल्याचं पहायला मिळत आहे.
-
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील नांदेड -सावखेडा मार्गावर पुलावरील रस्ता खचला
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील नांदेड -सावखेडा मार्गावर पुलावरील रस्ता खचला
रस्ता खचल्याने पुलाजवळ मोठं भगदाड, अपघाताचा धोका वाढला
रस्त्यावरील वळणावरच पुलावर रस्ता खचल्याच्या या घटनेमुळे अपघाताची शक्यता
कुठलाही दिशादर्शक अथवा बॅरिकेट या ठिकाणी लावण्यात आलेलं नाही
प्रशासनाचा निष्काळीपणा प्रवाशांच्या बेतू शकतो जीवावर
-
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर
विजय सरोदे यांच्या शेतात आढळला तब्बल १४ फूट लांबीचा अजगर
सर्पमित्र सागर भोई यांनी अजगराला पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले
शेतातील अजगरामुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
-
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, कुंभमेळा प्राधिकरणावर नाराज
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार हे कुंभमेळा प्राधिकरणावर नाराज झाले आहेत. बैठकीला बोलावून अधिकारीच उपस्थित न राहिल्याने शहराध्यक्षांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. पत्र लिहून सुनील केदार यांनी व्यक्त केली नाराजी.
-
इंदू मिल येथील राष्ट्रीय स्मारकाचं काम पूर्ण करावे- सचिन खरात
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मुख्यमंत्री साहेब यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करू नये आणि संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील राष्ट्रीय स्मारकाचं काम पूर्ण करावे मागणी केली.
-
मुंबईतील सेनाभवन समोर सणासुदीच्या निमित्ताने पक्षांमध्ये बॅनर वॉर
दादर, परळ, लालबाग या भागात मोठ्या प्रमाणात सण साजरे होतात. सणांचा हंगाम सुरू असल्याने प्रत्येक राजकिय पक्षाकडून बॅनरबाजी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चुरस सुरु असल्याचे दिसत आहे. शिंदेंची शिवसेना , ठाकरेंची शिवसेना , मनसे आणि भाजपमध्ये बॅनर वाॅर सुरु आहे.
-
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंडेंची धास्ती
वडापाव विक्रिसाठी नवे नियम लागू केल्यानंतर दादरच्या शिवसेना भवन जवळील प्रख्यात श्री स्वामी समर्थ वडापाव स्टाॅलवर वृत्तपत्रांचा वापर बंद केला आहे. वडापाव बांधण्यासाठी बटर पेपरचा वापर सुरू केला असून विक्रेत्यांकडून डोक्यावर सेफ्टी कॅप वापरायला सुरवात केली आहे.
-
शेतकऱ्याने पाऊस नसल्याने तीन एकर ऊस मोडला
गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील शेतकऱ्याने पाऊस नसल्याने तीन एकर ऊस मोडला. एकीकडे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकं करपायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे पाऊस नसल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या शेतकऱ्याने दुष्काळ जाहीर करून गुरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे.
-
दिल्लीकरांना स्वस्त कांदा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
दिल्लीकरांना स्वस्त कांदा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय; लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला लोडिंग होण्याच्या प्रतीक्षेत.कांद्याची प्रतवारी-पॅकिंग वेळेत न झाल्याने मालगाडी भरण्यास तब्बल २५ ते २६ तासांचा विलंब. सोमवारी रात्री ११.५० वाजता २१ बोगींची मालगाडी लासलगावात दाखल. सकाळी ७ वाजेपर्यंत रवाना होणे अपेक्षित. मालगाडीला विलंबमुळे सेंट्रल वखार महामंडळाला प्रति तास ३ हजार १५० रुपयांचा दंड.
-
शेतकऱ्याने अडीच एकरातील उडीद पिकावर फिरवला रोटाव्हेटर
जळगावात आसोदा गावात शेतकऱ्याने अडीच एकरातील उडीद पिकावर फिरवला रोटाव्हेटर. पावसाने दडी मारल्याने आसोदा येथील दत्तू चौधरी या चिंताग्रस्त शेतकऱ्याने उडीद पिकावर फिरवला रोटाव्हेटर. पावसाअभावी लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने बळीराजा हवालदिल. पावसाने ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पाठ फिरवल्यामुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी संकटात.
-
टिपू सुलतान यांच्या फोटोवरून हिंदुत्ववादी संघटनांचा अल्टीमेटम
उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजच्या आज हा फोटो हटवावा, अन्यथा महापालिकेत घुसून आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. टिपू सुलतान यांच्या फोटोसोबतच फातिमा शेख यांच्या फोटोला देखील हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकारामुळे शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे.
-
धाराशिव जिल्ह्यातील १९ निवासी आश्रमशाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न!
धाराशिव जिल्ह्यातील ३८ निवासी आश्रमशाळांपैकी सातवीपर्यंतच्या १९ आश्रमशाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी महिला अधीक्षक नसल्याची धक्कादायक माहिती समोर नियमाप्रमाणे मुलींच्या निवासी आश्रमशाळेत महिला अधीक्षकाची नियुक्ती असणे आवश्यक असताना, १९ शाळांमध्ये महिला अधीक्षक नसल्याची माहिती समोर आल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
-
नाशिक शहरासह जिल्ह्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाकडून आज यलो अलर्ट. काल दुपारी १२ वाजल्यापासून शहर व परिसरात वेगवान वाऱ्यासह मध्यम सरींचा पाऊस….सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात २.१ मिमी पावसाची नोंद…आज घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता….
-
पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ईद-ए-मिलादचा उत्साह
सोलापुरातही ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांकडून मोठी तयारी करण्यात आलीय. मुस्लिमबहुल भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारची सजावट करण्यात आलीय. तर शहरातील प्रमुख चौकांमध्ये इस्लामिक संस्कृती आणि पैगंबरांच्या जीवनाशी संबंधित विविध देखावे साकारण्यात आलेत.
-
महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं हॉटले व्यवसाय पदार्पण
अनेक राजकीय नेते ह्या उद्घाटनाला उपस्थित होते मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चाना उधाण आलय. दोन दिवसांपूर्वी कल्याणीनगर मधील पॉश भागात The Nines या नावाने हॉटेल सुरू केलं आहे. मात्र हे हॉटेलच उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्या वर टीकेची झोड उठवली आहे
-
मुंबईतील इसेटर्न फ्रीवेच्या खालून वडाळाहून शिवडीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्या.
खारू खाडीवरील पूल धोकादायक झाल्याने सर्व वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाहतूक बंद करण्यासाठी प्रशासनाने बॅरिकेड्स त्या ऐवजी संपुर्ण रस्ताच खोदून ठेवलाय. मुंबई बंदर प्राधिकरणाकडून पुलावर स्पष्ट सूचना फलक लावण्यात आला. पूल कमकुवत झाल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागून तीन बाळांच्या मृत्यू झाला. पहाटे जन्मलेल बाळ उपचाराविना रुग्णालयातून परत. नेर पिंगळाईचे पालक फैजान खान यांची मोठी ससेहोलपट; आईची प्रकृती चिंताजनक, बाळाला घेऊन खाजगी रुग्णालयात धाव. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला. त्यातच अभिजीत दिपके यांनी अत्यंत मोठा इशारा दिला. अभिजीत दिपके सरकारविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. अभिजीत दिपके 5 सप्टेंबरला मोर्चा काढणार आहेत. देशात साखरेचे भाव गगणाला पोहोचताना दिसत आहेत. त्यामध्येच सरकारकडून मोठे पाऊले उचलली जात आहेत. काही नियमात त्यांनी बदल केले.
Published On - Aug 26,2026 9:06 AM
