AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर माणसं चालतात की जनावरं? कैलाश खेर यांनी भर कार्यक्रमात काढले माजी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे

बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून नेहमी नाराजी व्यक्त करण्यात येते. पण आता गायक कैलाश खेर यांनी भर कार्यक्रमात माजी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले आहेत.

रस्त्यावर माणसं चालतात की जनावरं? कैलाश खेर यांनी भर कार्यक्रमात काढले माजी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे
| Updated on: Mar 03, 2026 | 1:35 PM
Share

गायक कैलाश खेर यांनीही शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था आणि खराब रस्त्यांवर टीका केली आहे. नांदेडमधील खराब रस्त्यांचा सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांना मोठा फटका बसला आहे. कैलासा लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नांदेडच्या वाहतूकीसह खड्ड्याबाबत पद्मश्री कैलाश खेर यांनी माजी माजी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काझल आहे. कुसुम महोत्सवात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच कैलाश खेर यांनी शहरातील दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कैलाश खेर यांच्या वक्तव्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.

बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागतो. वाहतूक शिस्त नसल्याने वारंवार कोंडी होत असते आणि याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्यातच आता या गंभीर समस्येचा फटका आता सुप्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांना ही बसला. नांदेडमध्ये आयोजित कुसुम महोत्सवासाठी आलेल्या गायक कैलाश खेर यांना या समस्येचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच रस्त्यांच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत वाभाडे काढले.

कैलाश खेर म्हणाले “रस्त्यावर माणसं चालत आहेत की जनावरं, हेच कळत नाही. खड्ड्यांमुळे सतत धक्क लागत होते. वाहनात बसून येताना अक्षरशः खुंटीला टांगल्यासारखं वाटलं… असं देखील कैलाश खेर म्हणाले. अशात कैलाश खेर यांच्या धडक वक्तव्यानंतर पुन्हा शहरातील मुलभूत सुविधांचा प्रश्न समोर आला आहे.

सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा कैलाश खेर यांनी सामाजिक मुद्द्यावर त्यांचा आवाज उठवला आहे. याआधी देखील कैलाश खेर यांनी खड्डेमय रस्त्यांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. कैलाश खेर यांनी अनेक गाणी गात, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘अल्लाह के बंदे हंस दे’ आणि ‘रब्बा इश्क न होवे’ यांसारखी एकापेक्षा एक गाणी गात त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं… त्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्यांच्या शोच्या प्रतिक्षेत चाहते असतात.

Follow Us
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.