Manipur | ‘कईसन बा तोहार चौकीदरिया हो, इज्जतिया लुटाई गईले हो!’, प्रसिद्ध गायिकेची कविता थक्क करणारी
'दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातल्यामुळे धर्म संकटात आला आणि आता मणिपूरमध्ये महिलांची निवस्त्र धिंड तेव्हा...', प्रसिद्ध गायिकेने का साधला कंगना रनौत हिच्यावर निशाणा....

मुंबई | 22 जुलै 2023 : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. संपूर्ण देशात मणिपूरच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. ४ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली आणि बुधवारी घटनेचा व्हिडीओ समोर आल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. यामध्ये अनेकांनी स्वतःचे प्राण देखील गमावले आहेत. मणिपूरमधील घटनेचे पडसाद देशभरात उमटल्यानंतर राजकारणी, खेळाडू, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री देखील या घटनेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत. मणिपूर घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली असताना अभिनेत्री कंगना रनौत आतापर्यंत गप्प का असा प्रश्न भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोड हिने व्यक्त केला आहे.
भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोड हिने सोशल मीडियावर एक कविता स्वतःच्या आवाजात गात पोस्ट केली आहे. गायिकेची कविता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘कईसन बा तोहार चौकीदरिया हो, इज्जतिया लुटाई गईले हो!’ गायिकेची ही कविता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दीपिका ने एक नारंगी बिकिनी पहन ली थी तो पूरी भारतीय संस्कृति और धर्म खतरे में आ गया था, लेकिन जब भीड़ ने आदिवासी लड़कियों को निर्वस्त्र करके घुमाया तो जैसे कुछ हुआ ही नहीं!
कहां गया वो महिला मोर्चा जो मेरे पुतले फूंक रहा था? कहां गए वो भांड-दरबारी कवि और गायक जो मुझे जवाब देने…
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) July 21, 2023
कवितेचा व्हिडीओ पोस्ट करत गायिकेने कंगना रनौत हिच्यावर निशाणा साधला आहे. गायिका म्हणाली, ‘दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातल्यामुळे धर्म संकटात आला आणि आता मणिपूरमध्ये महिलांची निवस्त्र धिंड तेव्हा काही झालंच नाही!’
पुढे गायिका म्हणाली, ‘महिलांचा तो मोर्चा कुठे गेला ज्यांना माझे पुतळे जाळले? कुठे गेले ते दरबारी कवी आणि गायक जे मला उत्तर देण्यासाठी पुढे आले होते? ‘ एवढंच नाही तर नेहा सिंह राठोड हिने कंगनावर देखील निशाणा साधला आहे, ‘कंगना सध्या साइलेन्ट मोडमध्ये आहे. महिलांच्या हक्कांवर आता काही बोलणार नाही का?’ असं देखील गायिका ट्विट करत म्हणाली आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार सुरु होते. मणिपूरमध्ये होणाऱ्या हिंसाचारावर सरकारने कोणतंही पाऊल उचललं नाही. यावर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. “दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात येत असल्याचा व्हिडीओ अस्वस्थ करणारा असून केंद्र आणि राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करेल”, असं न्यायालयाने बजावलं.
