AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धू मूसवालाने निधनानंतर मागे सोडली कोट्यवधींची संपत्ती, आईच्या डिलिव्हरीनंतर कुटुंबाला मिळणार वारस

singer sidhu moosewala | सिद्धू मूसवालाचं निधन, मागे सोडली कोट्यवधींची संपत्ती, आई वयाच्या 58 व्या वर्षी गरोदर, गायकाच्या संपत्तीला लवकरच मिळणार वारस..., सध्या सर्वत्र मुसेवाला याच्या आईच्या प्रेग्नेंसीची चर्चा...

सिद्धू मूसवालाने निधनानंतर मागे सोडली कोट्यवधींची संपत्ती, आईच्या डिलिव्हरीनंतर कुटुंबाला मिळणार वारस
| Updated on: Feb 29, 2024 | 8:16 AM
Share

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली. मृत्यूनंतर देखील सिद्धू कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता सिद्धू याची नाहीतर, त्याच्या आई – वडिलांची चर्चा रंगली आहे. सिद्धू याची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या महिन्यात चरण कौर बाळाला जन्म देतील असं देखील सांगण्यात येत आहे.

सिद्धू मुसेवाला याच्या निधनानंतर त्याचे आई-वडील पूर्णपणे एकटे पडले आहेत. पण आता सिद्धू मुसेवाला याच्या घरात आनंदाची बातमी येणार आहे. सांगायचं झालं तर, निधनानंतर सिद्धू मुसेवाला कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेला. आता गायकाच्या संपत्तीला देखील वारस मिळणार आहे. सिद्धू याची फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील गडगंज संपत्ती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला याच्या नेटवर्थचा जो रिपोर्ट समोर आला होता. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की, USD 14 मिलियन म्हणजे 114 कोटी रुपये सिद्धू मुसेवाला मागे सोडून गेला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिद्धू मुसेवाला याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. सिद्धू मुसेवाला एका कॉन्सर्टसाठी तब्बल 12 लाख रुपये मानधन घ्यायचा.

ऑस्ट्रेलिया पासून अमेरिका आणि कॅनडा पर्यंत सिद्धू मुसेवाला याच्या कॉन्सर्टसाठी लाखो चाहत्यांची गर्दी जमायची… एवढंच नाहीतर, सिद्धू मिसेवाला याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील होतं. पांढऱ्या रंगाच्या रेंज रोव्हर, इसुझू डी मॅक्स, मर्सिडीज एएमजी 63, मस्टँग, फॉर्च्युनर, जीप आणि टोयोटा अशा अनेक आलिशान कार होत्या.

सिद्धू मुसेवाला याच्या अनेक गाड्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. याशिवाय सिद्धू मूसेवाला याला चांगल्या आणि महागड्या बाइक्सची खूप आवड होती. गायकाकडे महागड्या बाईक्स देखील कलेक्शन आहे. फक्त देशात नाही तर, परदेशात देखील सिद्धू मुसेवाला याची आलिशान घरे आहेत.

पंजाबमधील आलिशान हवेलीशिवाय कॅनडातही सिद्धू मुसेवाला याचं स्वत:चे आलिशान घर असल्याचं सांगितले जातं. सिद्धू मुसेवाला याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. गायनाच्या माध्यमातून त्याने कोट्यवधींची संपत्ती जमा केली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निधनानंतर देखील सिद्धू मुसेवाला याने प्रचंड कमाई केली.

सिद्धू मुसेवाला याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात आहे. आज देखील सिद्धू मुसेवाला याची गाणी ऐकणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. ज्यामुळे आजही गायकाची मोठी कमाई होते. युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही सिद्धू मुसेवाला याची कमाई होते.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं