Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांचं लग्न होणार होतं? खुद्द गायकाने सांगितलं सत्य
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि गायक सुरेश वाडकर यांचं का नाही झालं लग्न? कुटुंबियांनी पुढाकार घेतलेला पण... खुद्द गायकाने सांगितलं तेव्हा नक्की काय झालं होतं?

Madhuri Dixit : डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या नावाची चर्चा अनेक पुरुषांसोबत रंगली. एक काळ असा देखील होता जेव्हा माधुरी हिचं बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत लग्नाच्या देखील चर्चा रंगल्या. माधुरी हिच्या कुटुंबियांनी सुरेश वाडकर यांच्या घरी लग्नासाठी स्थळ पाठलेलं… असं देखील अनेकदा समोर आलं. पण यावर सुरेश वाडकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. एका कार्यक्रमात सुरेश वाडकरांनी काय झालेलं सांगितलं. शिवाय माधुरी हिच्यासोबत लग्न का होऊ शकलं नाही. याबद्दल देखील मोठा खुलासा केला होता.
सुरेश वाडकर यांनी सांगितलं, माधुरी हिने जेव्हा बॉलिवूडमध्ये करियरची सुरुवात केली, तेव्हा अभिनेत्री आई – वडील मुलीच्या लग्नासाठी प्रस्ताव घेवून आले होते… दरम्यान, माधुरीच्या कुटुंबियांनी ‘परिंदा’ सिनेमाची कथा सांगितली आणि लग्नासाठी मागणी देखील केली. माधुरीचे कुटुंबिय म्हणाले, ‘माधुरी हिच्यासोबत लग्न केलं पाहिजे आणि संसार थाटला पाहिजे…’
यावर सुरेश वाडकर म्हणाले, ‘हा कार्यक्रम आता माधुरी बघत असेल… ती कधी मला समोर भेटली तर मारेल… ती पतंग आजही तिथेच लटकलेली आहे… आता काय होईल ते देवालाच माहिती… पण ही पतंग कोणी उडवली काहीही माहिती नाही… पण आजही ती पतंग हवेतच लटकलेली आहे… जर माधुरी हिचं माझ्यासोबत लग्न झालं असतं. तर ती आता माझ्यासोबत नसती का?’ असा प्रश्न देखील वाडकर यांनी उपस्थित केला.
रिपोर्टनुसार, माधुरी हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं करियर करावं अशी अभिनेत्रीच्या कुटुंबियांची इच्छा नव्हती… माधुरी हिने लग्न करुनल तिच्या घराकडे लक्ष दिलं पाहिजे.. अशी तिच्या कुटुंबियांची इच्छा होती.. ज्यामुळे माधुरी हिच्यासाठी चांगल्या मुलाचा शोध देखील सुरु करण्यात आला होता. अशात माधुरीच्या कुटुंबियांनी सुरेश वाडकर यांच्या घरी लग्नासाठी प्रस्ताव पाठवला…
पण वाडकरांनी प्रस्ताव नाकारला आणि सांगितल माधुरी सड-पातळ आहे. याच कारणामुळे माधुरीच्या पालकांना धक्का बसला आणि काळजी वाटली. त्यांना वाटलं की, माधुरीचं लग्न होणं खूप कठीण आहे आणि जर तिने सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली तर त्यामुळे आणखी समस्या निर्माण होतील.
माधुरी दीक्षित हिचं करियर आणि लग्न
माधुरी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ सिनेमातून अभिनेत्रीने करियरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘तेजाब’, ‘त्रिदेव’, ‘किशन कन्हैया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम तुम्हारे है सनम’ आणि ‘देवदास’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर 1999 मध्ये माधुरी हिने डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. आज माधुरी दोन मुलं आणि पतीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
