बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये सोहेल खानची पत्नी, मुलगा थेट म्हणाला, तू बांद्राला…
Sohail Khan and Seema Sajdeh : खान आणि त्याचे कुटुंबिय सध्या चांगलेच चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. सलमान खान याचा भाऊ सोहेल खान याच्या एक्स पत्नीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलाय. आता सीमा सजदेह ही तिच्या आयुष्यात पुढे गेल्याचे बघायला मिळतंय. तिने नुकताच मोठा खुलासा केलाय.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान आणि त्याचे कुटुंबिय तूफान चर्चेत आलेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्यावेळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यावेळी सलमान खान हा बिग बॉस सीजन 18 चे शूटिंग करत होता. त्याला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल कळताच त्याने लिलावती रूग्णालय गाठले. हेच नाही तर स्वत:च्या जीवाला धोका असताना देखील बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी सलमान खान हा पोहोचला होता. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. पोलिस त्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने आहेत. सलमानने विकेंडचा वार देखील होस्ट केलाय.
सलमान खान याचा भाऊ सोहेल खान हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलाय. सोहेल खान याची एक्स पत्नी सीमा सजदेह ही तिच्या आयुष्यात आता पुढे गेलीये. सीमा सजदेह रिलेशनशिपमध्ये असून ती विक्रम आहुजा याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. याबद्दलचा खुलासा स्वत: सीमा सजदेह हिने एका शोमध्ये केलाय.
सीमा सजदेह आणि सोहेल खान यांचे दोन मुले आहेत. एका मुलाचे नाव निर्वान तर दुसऱ्याचे योहान आहे. आपल्या रिलेशनबद्दल कळाल्यानंतर तिच्या मुलांची काय प्रतिक्रिया होती हे सांगताना सीमा सजदेह ही दिसलीये. सीमा सजदेह म्हणाली की, सर्वजण माझ्याबद्दल बोलत आहेत कारण मी आयुष्यात पुढे गेलीये मी मूव ऑन केले.
मी निर्वानला विचारले की, तुला पण काही नाराजी आहे? त्यावर निर्वानने मला म्हटले की, अजिबातच नाही. त्याने मला म्हटले की, मां एक पॉइंटवर तुला मूव ऑन करावेच लागणार होते. निर्वानने मला स्पष्टपणे म्हटले की, त्याला काहीच समस्या नाहीये. त्याने मला म्हटले तू आनंदी असशील तर मी देखील आनंदी आहे.
त्याने मला म्हटले, असे पण तू किती दिवस तणावाच्या वातावरणात राहणार ना. फक्त त्याने मला म्हटले की, तू बांद्राला पाहिजे. तू बांद्राला असशील तर तुला दररोज भेटू शकतो पाहू शकतो. तू बांद्राला वापस ये…सीमा सजदेह ही लोअर परेलला शिफ्ट झालीये. विशेष म्हणजे विक्रम आहुजा हा तोच आहे ज्याच्यासोबत सोहेल खान याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सीमाचा साखरपुडा झाला होता.