सलमान खानला मिळणाऱ्या धमक्या, भावाची पहिली बायको म्हणाली, ‘भीती वाटते पण…’

Salman Khan: 'भीती वाटते पण...', सलमान खान सतत मिळत आहेत जीवेमारण्याच्या धमक्या..., भावाच्या पहिल्या बायकोने सांगितली कुटुंबातील परिस्थिती, गेल्या काही दिवसांपासून खान कुटुंब सर्वत्र चर्चेत आहे.

सलमान खानला मिळणाऱ्या धमक्या, भावाची पहिली बायको म्हणाली, भीती वाटते पण...
| Updated on: Oct 29, 2024 | 9:47 AM

Salman Khan: अभिनेता समलान खान गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. भाईजानला सतत जीवेमारण्याच्या धमक्या मिळत असल्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, सलमान खान याचे खास मित्र आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार आणि हत्या प्रकरणानंतर खान कुटुंबात देखील भीतीचं वातावरण आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. खान कुटुंबात भीतीचं वातावरण असताना सलमान खान याचा लहान भाऊ सोहैल खान याची पहिली पत्नी सीमा हिने तिच्या मुलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ‘खंरच सांगते जेव्हा पहिल्यांदा बातमी आली की, सलमान भाईला धमक्या मिळत आहेत. तेव्हा मी पूर्णपणे घाबरली होती. माझी मुलं आणि खान कुटुंबांच्या सुरक्षेसाठी मी चिंतेत होती. अशात तुम्ही फक्त एकाच गोष्टीचा विचार करता आणि ती म्हणजे, जे काही असूदे फक्त प्रत्येक जण सुरक्षित असूदे…’ असं देखील सीमा म्हणाली.

 

 

सोहैल सोबत असलेल्या नात्यावर सीमा म्हणाली, ‘जेव्हा आम्ही द फॅबुलस लाईव्स आणि बॉलिवूड वाइव्स’ शोच्या पहिल्या सीझनचं शुटिंग करत होतो, तेव्हा माझा आणि सोहैलचा घटस्फोट झाला नव्हता. सोहैल आणि माझे दोन क्यूट मुलं आहेत, निर्वान आणि योहान… त्यामुळे सोहैल आणि खान कुटुंबासोबत संबंध राहतील… आम्ही आमच्या आयुष्यात पुढे गेलो तरी मुलांसाठी कायम एकत्र येऊ…’ असं देखील सीमा म्हणाली.

सीमा आणि सोहैल यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 1998 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या 24 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सीमा हिचे खान कुटुंबासोबत संबंध असल्यामुळे ती कायम चर्चेत असते. सीमा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सीमा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.