आदेश बांदेकरांचा लेक सोहमने घेतला पत्नी पूजासाठी हटके उखाणा, सगळेच खळखळून हसले
आदेश बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. पूजा आणि सोहमच्या लग्नासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. यांच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांच्या लग्नासाठी सर्वत्र फुलांची सजावट, पूजा सोहमच्या ग्रॅंड एन्ट्रीसाठी खास स्टेज सजवण्यात आला होता. अखेर त्यांच्या लग्नाचा लग्नाचा पहिला फोटो सर्वांसमोर आलेला आहे.

महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा लाडका लेक सोहमचा आज 2 डिसेंबर 2025 रोजी विवाह सोहळा दणक्यात पार पडला. पूजा आणि सोहमच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. दोघांचे केळवण, ते मेहंदी आणि हळदीच्या समारंभाची देखील जोरदार चर्चा झाली. त्या समारंभाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यासर्वांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.
पूजा व सोहम यांच्या लग्नासाठी संपूर्ण मराठी कलाविश्वातील कलाकार एकत्र जमले होते. सोमवारी या दोघांचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना अनेक कलाकारांची झलक पाहायला मिळाली. बांदेकरांच्या मुलाला व सुनेला आशीर्वाद देण्यासाठी जवळपास सगळेच कलाकार हजर होते.
सोहमने घेतला पूजासाठी हटके उखाणा
सोहम व पूजा यांचा लग्नसोहळा मुंबईत नव्हे तर लोणावळा येथे पार पडला. दरम्यान लग्नानंतर विधी सुरु असतानाच सोहमने पूजासाठी घेतलेला उखाण्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोहमने झालेल्या बायकोसाठी एक हटके उखाणा घेतला आहे. जो ऐकून सगळेच खळखळून हसले. सोहमने उखाणा घेताना म्हटलं ‘झालेल्या बायकोचं नाव आहे पूजा तेसेसिवा ना कोई मेरा दुजा’. त्याचा उखाणा ऐकताच पूजा देखील हसू लागल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
सोहम आणि पूजाचा विवाह सोहळा मराठी पारंपारीक पद्धतीने पार पडला. दोघांनीही गुलाबी रंगाचा अगदी एकमेकांना साजेसा असा लग्नाचा पारंपारिक लूक देणारा पेहराव केला होता.या जोडीला आशीर्वाद द्यायला सगळेच कलाकार उपस्थित होते.
लग्नाला जवळपास सर्वच मराठी कलाकारांची उपस्थिती
सोहमच्या लग्नातील बरेच इनसाइड व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहे. एका व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना सचित पाटील, अभिजीत केळकर, ऋजुता देशमुख, अजित परब, सुमीत राघवन, दिपाली विचारे, सानिका बनारसवाले, सुकन्या मोने अशा बऱ्याच कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. लग्नाला आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आदेश व सुचित्रा बांदेकर मोठ्या आपुलकीने स्वागत करत असल्याचं व्हायरल व्हिडीओजमध्ये पाहायला मिळालं.
View this post on Instagram
सोहम अन् पूजाच्या कामाबद्दल
सोहम सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या दोन मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तर पूजा बिरारी सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या टीमने तिचं केळवण सुद्धा केलं होतं. त्यामुळे या मालिकेच्या टीमचे काहीजण सुद्धा पूजाला शुभेच्छा देण्यासाठी लग्नाला येतील.
