सलमान खान मला सोडणार नाही, जोपर्यंत मी मरत नाही, या अभिनेत्रीने केला मोठा दावा, नेमकं काय घडलं?

'सलमान खान माझा पाठलाग करणे बंद करणार नाही, जोपर्यंत मी मरत नाही', असा दावा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केला आहे. नेमकं काय घडलं?

सलमान खान मला सोडणार नाही, जोपर्यंत मी मरत नाही, या अभिनेत्रीने केला मोठा दावा, नेमकं काय घडलं?
| Updated on: Jul 16, 2026 | 3:16 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याची माजी प्रेयसी आणि अभिनेत्री सोमी अली हिने केलेल्या दाव्यांमुळे. एका मुलाखतीत सोमी अलीने सांगितले की, तिने सलमान खानला त्याच्या वैयक्तीक क्रमांकावर मेसेज करून बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सलमानने तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा तिने केला.

निधी वासंदानी यांना दिलेल्या मुलाखतीत सोमी अली म्हणाली, ‘मी सलमान खानच्या खासगी नंबरवर मेसेज पाठवला होता. त्यात मी त्याला अजूनही वेळ गेलेली नाही. तु बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन तुम्ही केलेल्या चुकीबद्दल माफी माग. त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल, असे सांगितले होते. मात्र त्याने माझ्या या सल्ल्याची दखल घेतली नाही.’

बिश्नोई समाजालाही केली होती विनंती

सोमी अलीने केवळ सलमान खानलाच नाही तर बिश्नोई समाजालाही आवाहन केल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘सलमान खानचा जीव घेतल्याने काळा हरिण परत येणार नाही. मी सलमानच्या वतीने हात जोडून विनंती केली होती की, त्याला माफ करा. माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नाही.’

मुलाखतीदरम्यान सोमी अलीने सलमान खानवर वैयक्तिक आरोपही केले. ‘तो मला शांतपणे जगू देत नाही. गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर सलमान दुबईला गेला होता. तिथे माझ्या सावत्र बहिणीला भेटला, जिच्याशी माझा कोणताही संपर्क नाही. तिच्या मुलाच्या शाळेच्या उद्घाटनालाही तो गेला. तो सतत माझ्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेला राहण्याचा प्रयत्न करतो. त्याची तशी काहीच गरज नव्हती’ असा दावा तिने केला.

यापुढे ती म्हणाली, ‘तो मला त्रास देण्याची संधी शोधत असतो. मी आयुष्यात पुढे जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे. तो माझा पाठलाग सोडणार नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे.’ याचवेळी तिने सलमान खानला सर्वात कंजूस व्यक्ती असेही संबोधले.

सलमान–सोमी वाद नेमका काय?

सलमान खान आणि सोमी अली 1990 च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे नाते त्या काळात बऱ्याच चर्चेत होते. काही वर्षांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर सोमी अलीने अनेक वेळा सलमान खानवर गंभीर आरोप केले. विविध मुलाखती आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे तिने नात्यात असताना मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या आरोपांवर सलमान खानने सार्वजनिकरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे दोघांतील हा वाद अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे.

Follow Us