सोनाक्षी सिन्हा हिच्या आईने थेट कॅमेऱ्यासमोर जावई जहीर इक्बालला फटकारे, थेट म्हटले, माझ्या मुलीला सोड..

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. सोनाक्षीने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. सध्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या घराची झलक चाहत्यांना बघायला मिळाली आहे.

सोनाक्षी सिन्हा हिच्या आईने थेट कॅमेऱ्यासमोर जावई जहीर इक्बालला फटकारे, थेट म्हटले, माझ्या मुलीला सोड..
Sonakshi Sinha, mother and Zaheer Iqbal
| Updated on: Dec 21, 2025 | 9:12 AM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सोनाक्षीने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. मात्र, अचानक सोनाक्षीने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले आणि एकच खळबळ उडाली. सोनाक्षीला यावरून लोकांनी बरेच सुनावले. हेच नाही तर अनेकांनी थेट लव्ह जिहाद देखील म्हटले. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जहीरसोबत थाटामाटात लग्न केले. सोनाक्षीचे लग्न तिच्या घरी झाले. मात्र, लग्नानंतर तिने जंगी पार्टीचे आयोजन केले. या पार्टीला जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांनी सिव्हील मॅरेज केले. सोनाक्षीचे आई वडील आणि अत्यंत जवळचे काही लोक यादरम्यान उपस्थित होते. सोनाक्षी हिने लग्नानंतर काही दिवस तिचे खासगी आयुष्य जगापासून दूर ठेवले.

आता सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल खुलासे करताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल 7 वर्ष जहीर इक्बाल याला डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल 5 वर्ष जहीर इक्बालबद्दल घरच्यांपासून लपवून ठेवले. जहीरबद्दल तिने सर्वात अगोदर आपल्या आईला सांगितले. सोनाक्षीची आई पूनम सिन्हा हिने देखील वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती.

फराह खान ही सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या नव्या घरी पोहोचली. यावेळी सोनाक्षीच्या घराची खास झलक चाहत्यांना बघायला मिळाली. सोनाक्षी सिन्हा हिच्या आईने खास फराह खान हिच्यासाठी मटन तयार केले. फराह खान या चिकनची तारीफ करताना दिसली आणि पूनम सिन्हा यांनी जबरदस्त मटन बनवल्याचे म्हणत फराह खान मस्त ताव मारताना दिसली.

दुसरीकडे जहीर इक्बाल हा एका प्लेटमध्ये मटन घेताना दिसत आहे. चांगले पीस काढताना जहीरला पाहून लगेचच पूनम सिन्हा कॅमेऱ्यासमोर म्हणाल्या की, भई माझ्या मुलीसाठी नल्ली सोड ना… यावर जहीर इक्बाल म्हणाला की, तुमच्या मुलीलाच देत आहे.. मात्र, पूनम सिन्हा यांचे हे बोलणे लोकांना फार काही आवडले नाही. जावयाला अशाप्रकारे बोलणे चुकीचे असल्याचे काहींनी म्हटले.