Special Story | वेब सीरीज विश्वातील अंधाऱ्या वाटा, मनोरंजनाच्या नावे केवळ अश्लीलता?

खरंच या वेब सीरीज मनोरंजन करतात की केवळ ‘अडल्ट कंटेंट’ दाखवून पैसा कमावण्याचा मार्ग अवलंबतात, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, वाचा याविषयी स्पेशल रिपोर्ट (Adult Content in Web Series)

Special Story | वेब सीरीज विश्वातील अंधाऱ्या वाटा, मनोरंजनाच्या नावे केवळ अश्लीलता?
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 4:15 PM

मुंबई : आजच्या काळात चित्रपट केवळ थिएटर पुरतेच बनवले जात नाहीत. आता लोक घरी बसून इंटरनेटवर चित्रपट पाहतात. ‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन प्राईम’, ‘अल्ट बालाजी’, ‘झी 5’ सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म लोकांना घरबसल्या चित्रपट पाहण्याचा आनंद देत आहेत. या प्लॅटफॉर्मवर केवळ चित्रपटच नाही तर विविध प्रकारच्या वेब सीरीज देखील उपलब्ध आहेत. या वेब सीरीजमध्ये प्रौढ सामग्री अर्थात ‘अडल्ट कंटेंट’ अगदी भरभरून दाखवला जात आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा वेब सीरीज बंद करण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे. (Special Story on Adult Content in Web Series)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पौरपुरुष’ या वेब सीरीजमुळे पुन्हा एकदा हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. पौराणिक कथेवर आधारित या वेब सीरीजमध्ये अनेक आक्षेपार्ह दृश्य चित्रित करण्यात आली आहे. केवळ ‘अडल्ट कंटेंट’च नव्हे तर, या वेब सीरीजमध्ये महिलांवर अमानुष अत्याचारही दाखवण्यात आला आहे. या वेब सीरीजमधील एका अभिनेत्रीने चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से मुलाखतीमध्ये सांगितले. दृश्य जिवंत वाटावी म्हणून चक्क वितळलेले गरम मेण तिच्या पाठीवर ओतण्यात आले होते. अर्थात सुरक्षिततेचा उपाय म्हणून तिला सिलिकॉनचे बॉडी कव्हर देण्यात आले होते. मात्र, यानंतर खरंच या वेब सीरीज मनोरंजन करतात की केवळ ‘अडल्ट कंटेंट’ दाखवून पैसा कमावण्याचा मार्ग अवलंबतात, हा एक मोठा प्रश्न प्रेक्षक वर्गासमोरही निर्माण झाला आहे.

समाज मनावर मोठा परिणाम!

मागील दोन वर्षांपासून जर आपण हे पाहिले तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वेब सीरीज तरुणांना प्रचंड आकर्षित करत आहे. या वेब सीरीजनी चक्क टीव्ही मालिकांनाही मागे सोडले आहे. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोणत्याही व्यत्ययाशिवाय हवी असलेली ‘कथा’ प्रसारित करणे. मनोरंजन आणि सर्जनशीलतेच्या नावाखाली या सीरीजमध्ये काहीही दाखवले जात आहे. सध्या वेब सीरीजच्या मुखवट्याखाली प्रौढ सामग्री मिळवण्याचा एक सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे.

टीव्ही आणि चित्रपटांवर सेन्सॉरचे लक्ष असल्याने त्यातील कथा-आशयावर ‘फिल्टर’ लावला जातो. मात्र, वेब विश्वात सेन्सॉरची भीती नसल्याने ‘ती’ दृश्ये चित्रित करताना किंवा प्रदर्शित करताना कोणत्याही आक्षेप घेतला जात नाही. मात्र, लवकरच या अंधाऱ्या वाटेवरही ‘सेन्सॉर’चा प्रकाश पडणार आहे.

अश्लीलतच नव्हे, धार्मिक भावनांचाही अनादर!

वेब सीरीजच्या विश्वातला आणखी एक महत्त्वाचा चर्चित मुद्दा म्हणजे धार्मिक भावनांचा अनादर. मध्यंतरी अभिनेता बॉबी देओल अभिनित, प्रकाश झा यांची ‘आश्रम’ ही वेब सीरीज देखील याच मुद्द्यांमुळे अडचणीत सापडली होती. आश्रमाच्या नावाखाली चालणारे काळे धंदे, ढोंगी बाबा आणि धार्मिक भावनांचा बाजार या सगळ्यामुळे ही वेब सीरीज वादात अडकली होती. ‘आश्रम’वर बंदी घालण्यात यांनी म्हणून अनेक याचिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, या सगळ्यांना मागे थोपवत ही वेब सीरीज अखेर प्रदर्शित झाली आणि त्याला भरभरून व्ह्युव्ह्ज देखील मिळाले. मात्र, धार्मिक भावनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

‘गंदी बात’मध्ये अडकलेले प्रेक्षक

प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’वर अक्षरशः प्रौढ सामग्रीच्या कथांचा भडीमार केला गेला आहे. समाजाला आरसा दाखवताना मनोरंजनाच्या मर्यादा ओलांडून त्या पलीकडे निघून गेलेल्या या ‘पटकथां’मध्ये प्रेक्षक गुंतून पडले आहेत. प्रेक्षकांचा वाढता कल पाहाता या वेब सीरीजचे एक-दोन नव्हे अनेक सिझन तयार केले जातात. प्रेक्षकही अगदी उत्सुकतेने याची वाट बघत असतात. यापैकीच एक गाजलेली वेब सीरीज म्हणजे ‘गंदी बात’. या वेब सीरीजचे पाचवे पर्व काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाले. याची लोकप्रियता पाहता आणखी किती पर्व येतील, याचा विचार आणि अंदाज दोन्ही करता येणं कठीण आहे.

मुलांच्या हातातील ‘गॅजेट’वर तुमचं लक्ष आहे का?

कोरोना काळात अगदी पहिली-दुसरीच्या मुलांच्या हातातही मोबाईल नावाचं खेळणं देण्यात आलं आहे. अशावेळी आपली मुलं यावर काय करतात याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मनोरंजन विश्वाच्या वाटा धुंडाळताना ते या अंधाऱ्या वाटेवर जाणार नाहीत, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. नकळत्या वयात झालेले हे आघात कायमस्वरूपी सलत राहणारे असतात. अशावेळी जर तुमच्या पाल्याच्या वागणुकीत बदल जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पालक किंवा प्रेक्षक म्हणून वेब सीरीज पाहताना खरंच आपलं मनोरंजन होतंय का?, हा प्रश्न स्वतःला विचारा.

(Special Story on Adult Content in Web Series)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.