सलमान खान याच्यासमोर रुबाबात बॉडीगार्ड उभा, पुढे जे घडले त्यानंतर सर्वजण हैराण, थेट..
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सलमान खान याने चाहत्यांचे मन जिंकले. चाहत्यांकडून त्याच्यावर काैतुकांचा वर्षाव होत आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान कायमच चर्चेत असतो. त्यामध्येच काही दिवसांपूर्वी सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. सलमान खानला गंभीर आजार झाल्याचाही अंदाज लावला जात होता. चाहत्यांमध्ये चिंता होती. मात्र, त्यानंतर सलमान खान यानेच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि चाहत्यांना प्रश्न विचारला. सध्या सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये सलमान खान त्याच्या स्वॅग पोझमध्ये दिसतोय. सलमान खान गाडीतून उतरतो. तिथे त्याचे बॉडीगार्ड उभे आहेत. त्यापैकी एक बॉडीगार्ड सलमान खान याच्यापुढेच उभा राहतो. सलमान खान त्याच्याकडे बघतोय, हे देखील त्याला लक्षात आले नाही. सलमान खान त्या बॉडीगार्डकडे रूबाबात बघतो.
सलमान खान त्याच्याकडे बघून हसतो, पण त्याचे लक्षच नव्हते. त्यानंतर त्याच्या लक्षात येते आणि तो लगेचच मागे सरकतो. सलमान खान चेहऱ्यावर स्माईल देताना दिसत आहे. त्यानंतर सलमान खान फोटोसाठी पोज देतो. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. सलमान खान अजिबात बॉडीगार्डवर चिडला नाही की, तो त्याच्या पुढे उभा आहे. उलट सलमान खान याने हे सर्व मस्करीत घेतले.
सलमान खान याचा हा स्वभाव चाहत्यांना प्रचंड आवडतोय. इतर सेलिब्रिटी त्यांचे बॉडीगार्ड पुढे आले की, इशारे करून त्यांना मागे जाण्यास सांगतात. मात्र, सलमान खान याने असे काहीच केले नाही, ज्यामुळेच त्याला बॉलिवूडचा भाईजान म्हटले जाते. सलमान खान सोशल मीडियावर सक्रिय आहे. तब्येतीबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर बोलतानाही सलमान खान दिसला.
View this post on Instagram
सलमान खान याच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. सलमान खान बिग बॉस 20 ला होस्ट करताना दिसणार आहे. हे सीजन 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिग बॉसला होस्ट करतो. अनेक चाहते सलमान खान बिग बॉसला होस्ट करत असल्यानेच बिग बॉस बघतात.
