तो मैत्रिणीसोबत आला, चौघांच्या शेजारी बसला… मध्येच असं काही झालं की थिएटरमध्ये राडा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार तरुणांनी थिएटरमध्ये जे काही केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. आता नेमकं काय झालं पाहा..

तो मैत्रिणीसोबत आला, चौघांच्या शेजारी बसला... मध्येच असं काही झालं की थिएटरमध्ये राडा
Viral video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 03, 2026 | 4:34 PM

सध्या सर्वत्र स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची क्रेझ तरुणांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने तरुण चित्रपट गृहांमध्ये हा सिनेमा पाहाण्यासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार तरुणांमध्ये जे काही झालं ते पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल पोस्टनुसार, चार मित्रांनी नुकताच रिलीज झालेला मार्वेल चित्रपट पाहण्याची योजना आखली होती आणि ते “मोठ्या उत्साहाने” थिएटरला गेले होते. ते एका पुरुष आणि त्याच्या महिला मित्राशेजारी बसले होते. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्या पुरुषाने स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे एकदा आधीच पाहिला होता आणि दुसऱ्यांदा पाहण्यासाठी आला होता. मात्र स्क्रीनिंग दरम्यान तो आपल्या साथीदाराला कथा आणि पुढील सीन सांगत होता.

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, “त्याने आधीच एकदा चित्रपट पाहिला होता आणि तिच्यासोबत पुन्हा पाहण्यासाठी आला होता. पाहताना तो तिला कथा सांगत होता आणि पुढील सीनमध्ये काय होणार याचे स्पॉइलर देत होता.” हे कथित स्पॉइलर त्याच्या शेजारी बसलेल्या चार मित्रांना सहन झाले नाही. पोस्टनुसार, “त्यांच्या शेजारी बसलेल्या चार मित्रांचा उत्साह खराब होत होता, कारण तो मुलगा पुढे काय होणार हे आधीच सांगत होता.” त्या पुरुषाकडे आणखी दुर्लक्ष करणे त्यांना शक्य झाले नाही. त्या चौघांचा शाब्दीक वाद सुरु झाल आणि हा वाद नंतर हाणामारीत रुपांतरीत झाला.

“शेवटी चार मित्रांनी सिनेमा हॉलमध्येच त्याच्याशी वाद घातला. हा वाद वाढला आणि ते एकमेकांना मारहाण करू लागले. थिएटरभर पूर्ण गोंधळ निर्माण झाला,” असा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला होता.

एक्सवर फिरणारा व्हिडीओ या घटनेनंतरचा दृश्य दाखवत आहे. गर्दीने भरलेल्या ऑडिटोरियममध्ये गोंधळ दिसत आहे. अनेक लोक मध्ये पडत आहेत, तर काहीजण हा गोंधळ पाहत आहेत. या व्हिडीओची सत्यता तसेच घटनेचे स्थान आणि परिस्थिती स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us